Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News: पाचगणीत ‘सफाई मित्रांचा’ गौरव! नगरपरिषद आणि हिलदारीतर्फे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

पाचगणी नगरपरिषद आणि नेस्ले प्रणीत 'हिलदारी' तर्फे उत्कृष्ट सफाई मित्रांचा गौरव. शहराची स्वच्छता राखणाऱ्या ६ कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र आणि रेशन किट देऊन सन्मानित करण्यात आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 01, 2026 | 09:07 PM
Wai News: पाचगणीत ‘सफाई मित्रांचा’ गौरव! नगरपरिषद आणि हिलदारीतर्फे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान
Follow Us
Follow Us:

 

  • पाचगणीत ‘सफाई मित्रांचा’ गौरव!
  • नगरपरिषद आणि हिलदारीतर्फे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान
वाई : पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि नेस्ले प्रणीत हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने “सफाई मित्र सुरक्षा” उपक्रमांतर्गत “उत्कृष्ट सफाई मित्र पुरस्कार” मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी, शाश्वत व जबाबदार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शहराची स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून, शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत त्यांच्या निष्ठा, परिश्रम आणि कर्तव्यपरायणतेची दखल घेण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामधून सफाई कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षितता, शिस्त, वैयक्तिक स्वच्छता आणि व्यावसायिकतेबाबत जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

पुरस्कारासाठी निवड प्रक्रिये दरम्यान सफाई कर्मचाऱ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती, कामाच्या वेळेत आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर, प्रशिक्षणांमध्ये सक्रिय सहभाग, आरोग्य तपासणी शिबिरांतील उपस्थिती, व्यसनमुक्त कामकाज, तसेच शासकीय योजनांमध्ये नोंदणी या निकषांचा विचार करण्यात आला. याशिवाय कामातील प्रामाणिकता, वैयक्तिक स्वच्छता व शिस्त, तसेच स्वयं सहाय्यता बचत गटातील सहभाग आणि उत्पादन निर्मितीतील योगदान या बाबींनाही महत्त्व देण्यात आले.

Wai News: वाईत अर्धवट विकासकामांवरून संताप; ठेकेदार बेपत्ता, प्रशासन मौन

सदर उपक्रमांतर्गत फेब्रुवारी व मार्च २०२६ या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शैलेंद्र चावरिया, गोपाल झांजोट, संजय विठ्ठल गायकवाड, संतोष सपकाळ, आकाश लोहरा आणि प्रल्हाद वैरागी यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र व रेशन किट असे आहे.

या कार्यक्रमास पंचगणी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. दिलीप भाऊ बगाडे, आरोग्य सभापती सौ. राजश्री सणस, मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील, सर्व नगरसेवक तसेच नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी प्रास्ताविक करत उपक्रमाची उद्दिष्टे व अंमलबजावणी याबाबत माहिती दिली.

या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान होऊन त्यांच्यात अभिमानाची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होणार असून, इतर कर्मचाऱ्यांनाही उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरणा मिळणार आहे. कार्यक्रमाच्या समारोपावेळी घाटजाई शहर विकास आघाडीचे प्रमुख श्री. शेखर कासुर्डे यांनी हा उपक्रम स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे नमूद करत नागरिकांनी स्वच्छता उपक्रमांना सक्रिय सहकार्य करावे व “स्वच्छता हीच सेवा” या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन केले व घनकचरा व्यवस्थापनात हिलदारी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

Satara News : रस्ते कामातील दिरंगाईवर वाईत नागरिकांचा संताप; नगरपरिषद सभेत प्रशासनाला जाब

Web Title: Honoring the hard work of sanitation workers special awards presented for outstanding performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • Satara
  • Wai News

संबंधित बातम्या

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार
1

साताऱ्याच्या शिलेदारांचा सन्मान! आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांची भव्य गौरव रॅली; साहिल, ऋतुजा अन् सुदेष्णाचा भव्य सत्कार

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
2

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!
3

Jallakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी सिंचन योजनेची गळती यंदा तरी थांबणार का? पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे वाईत पाणी वाया!

Dhom Dam Area : धोम धरण क्षेत्रात दगडी पूल आणि कंटेनर रूम,अतिक्रमणाला कोणाचा वरदहस्त पाटबंधारे विभागाच्या मौनावर प्रश्नचिन्ह
4

Dhom Dam Area : धोम धरण क्षेत्रात दगडी पूल आणि कंटेनर रूम,अतिक्रमणाला कोणाचा वरदहस्त पाटबंधारे विभागाच्या मौनावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.