Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर-डंपरमध्ये जोरदार धडक, वाहतूक ठप्प

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती. अनेक नागरिक लग्नसमारंभासाठी जात असताना वाहतूक कोंडीत अडकले. दुपारच्या कडक उन्हामुळे वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 15, 2026 | 12:44 PM
उत्तर प्रदेशात भीषण अपघात; 60 प्रवाशांना घेऊन जाणारी बसच उलटली, 25 जण जखमी

उत्तर प्रदेशात भीषण अपघात; 60 प्रवाशांना घेऊन जाणारी बसच उलटली, 25 जण जखमी

Follow Us
Follow Us:

चाकण : पुणे-नाशिक महामार्गावरील शिरोली फाट्याजवळ शनिवारी (दि.14) कंटेनर आणि डंपर यांच्यात भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातामुळे सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या डंपर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या दुभाजकावरून समोरच्या लेनमध्ये गेले आणि समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी अडकल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. काही वेळानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली.

दरम्यान, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती. अनेक नागरिक लग्नसमारंभासाठी जात असताना वाहतूक कोंडीत अडकले. त्यातच दुपारच्या कडक उन्हामुळे वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी नागरिकांना वाहनातून उतरून बराच वेळ रस्त्यावर थांबावे लागले.

वाहतूक कोंडीमुळे पर्यायी मार्गाचा वापर

वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामुळेदेखील आसपासच्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाली. शिरोली फाट्यापासून चाकणपर्यंत येण्यासाठी जवळपास तीन तास लागल्याची माहिती चाकण येथील उद्योजक अनंता शेवकरी आणि नवनाथ पठारे यांनी दिली.

प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महामार्गावर अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करणे आणि अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. पुणे–नाशिक महामार्गावर वाढती वाहतूक आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेता प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

हेदेखील वाचा : Maval Accident News : शिवज्योत आणताना काळाचा घाला! भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Web Title: Horrific accident on the pune nashik highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Accident News
  • Chakan News

संबंधित बातम्या

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या
1

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या

रस्ते अपघातांचे वाढते संकट, दररोज शेकडो जणांचा मृत्यू; लाखो कुटुंबांवर कोसळतोय दुःखाचा डोंगर
2

रस्ते अपघातांचे वाढते संकट, दररोज शेकडो जणांचा मृत्यू; लाखो कुटुंबांवर कोसळतोय दुःखाचा डोंगर

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! आळेफाटा बायपासवर भीषण अपघात; कार 3 वेळा पलटली अन् थेट…
3

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! आळेफाटा बायपासवर भीषण अपघात; कार 3 वेळा पलटली अन् थेट…

दिल्लीच्या वाटेवर निघाले अन् काळाने घातला घाला; संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू
4

दिल्लीच्या वाटेवर निघाले अन् काळाने घातला घाला; संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.