Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीच्या वाटेवर निघाले अन् काळाने घातला घाला; संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू

मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेवर गुरुवारी सकाळी कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2026 | 11:32 AM
दिल्लीच्या वाटेवर निघाले अन् काळाने घातला घाला; संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू

दिल्लीच्या वाटेवर निघाले अन् काळाने घातला घाला; संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : घरच्यांचा निरोप घेत, व्यवसाय वाढविण्याची स्वप्ने उराशी बाळगत सहा जण बुधवारी रात्री दिल्लीकडे निघाले होते. दुसऱ्या दिवशी नव्या मशीनरीची खरेदी करून परत येण्याच्या गप्पा रंगल्या होत्या. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेवर गुरुवारी सकाळी त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आणि क्षणार्धात कुटुंबांचे आधारवड हिरावले गेले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. संभाजीनगरात ही बातमी धडकताच व्यापारी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

 

राजेंद्र भावराव कवडे (वय ४६), संदीप नवनाथ बोरसे (वय ३५), सचिन गंगाधर गजभारे (वय ३७) आणि रवींद्र भागवत काळे (वय २८) अशी मृतांची नावे आहेत. अब्दुल खलील अब्दुल समद (वय ३०) आणि उमर इस्माईल जागीदार (वय ३२) हे गंभीर जखमी झाले आहेत. कॅनॉट परिसरात फोन प्लॅनेट या नावाने मोबाइल रिपेरिंगचे आधुनिक केंद्र सुरू करणारे राजेंद्र कवडे हे व्यवसायात नवे तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्नशील होते. दिल्लीतील सदर बाजारातून अत्याधुनिक मशीनरी खरेदी करण्यासाठी त्यांनी हा दौरा आखला होता. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास ते सहकाऱ्यांसह कारने दिल्लीकडे रवाना झाले. जळगावमार्गे मध्यप्रदेशात पोहोचल्यानंतर गुरुवारी सकाळी मंदसौरजवळ त्यांच्या वाहनाची ट्रकला जोरदार धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की चौघांना जीव गमवावा लागला.

चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले

रवींद्र काळे हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा. साडेतीन वर्षांचा मुलगा आणि गर्भवती पत्नी असा त्याचा परिवार. घराची जबाबदारी सांभाळणारा रवींद्र बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडला; पण परतलाच नाही. वडिलांच्या निधनाची कल्पनाही नसलेल्या त्या चिमुकल्याकडे पाहून नातेवाईकांच्या डोळ्यांत अश्रू दाटत होते.

अपघाताची बातमी खरी ठरली

दुर्घटनेची माहिती सकाळी शहरात पोहोचताच अनेकांच्या मोबाईलवर एकच संदेश फिरू लागला. काहींनी बातमी खरी नसावी, अशी प्रार्थना केली; मात्र काही वेळातच मृत्यूची माहिती निश्चित झाली आणि सर्वत्र शोककळा पसरली.

व्यवसायाची स्वप्ने अपूर्णच राहिली

काही महिन्यांपूर्वीच राजेंद्र कवडे यांनी नवीन दुकान सुरू केले होते. शहरातील ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणण्यासाठी ते दिल्लीला निघाले होते. मित्रांना कायम सोबत घेऊन चालणारा, नव्या कल्पनांवर चर्चा करणारा हा उत्साही चेहरा कायमचा हरपल्याने मोबाइल व्यावसायिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : बायको गाढ झोपेत होती, नवरा पहाटे तिच्या जवळ गेला अन्…; पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट

तुम्ही त्यांच्यासोबत होता का?

कॅनॉट परिसरातील मोबाइल व्यावसायिक अमोल पाटील यांनाही या दौऱ्यासाठी सोबत येण्याबाबत राजेंद्र कवडे यांनी विचारणा केली होती. मात्र अन्य कामामुळे त्यांनी जाणे टाळले. गुरुवारी सकाळी अपघाताची बातमी समजताच त्यांना अनेकांचे फोन आले. तुम्हीही त्यांच्यासोबत गेला होता का? अशी विचारणा अनेकांनी केली. काही तासांपूर्वी झालेला संवादच आता त्यांच्या आठवणींचा भाग ठरला आहे.

Web Title: In a shocking incident four people from sambhajinagar died on the spot in a horrific accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • Car Accident

संबंधित बातम्या

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प
1

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

Accident News: मोठी बातमी ! कॅबिनेट मंत्र्याचा मुलीसह कार अपघातात मृत्यू; कारला ट्रकची जोरदार धडक बसली अन्…
2

Accident News: मोठी बातमी ! कॅबिनेट मंत्र्याचा मुलीसह कार अपघातात मृत्यू; कारला ट्रकची जोरदार धडक बसली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.