Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्ते अपघातांचे वाढते संकट, दररोज शेकडो जणांचा मृत्यू; लाखो कुटुंबांवर कोसळतोय दुःखाचा डोंगर

रस्ते अपघात हा भारतासमोरील सर्वात गंभीर सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक-आर्थिक प्रश्न बनला आहे. महाराष्ट्रासह देशभरात दररोज शेकडो अपघात घडत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 28, 2026 | 12:30 AM
रस्ते अपघातांचे वाढते संकट, दररोज शेकडो जणांचा मृत्यू; लाखो कुटुंबांवर कोसळतोय दुःखाचा डोंगर

रस्ते अपघातांचे वाढते संकट, दररोज शेकडो जणांचा मृत्यू; लाखो कुटुंबांवर कोसळतोय दुःखाचा डोंगर

Follow Us
Follow Us:

बारामती/अमोल तोरणे : रस्ते अपघात हा भारतासमोरील सर्वात गंभीर सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक-आर्थिक प्रश्न बनला आहे. महाराष्ट्रासह देशभरात दररोज शेकडो अपघात घडत असून, त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. हजारो नागरिक गंभीर जखमी होत असून, अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे. परिणामी केवळ एका व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त होत नाही, तर संपूर्ण कुटुंब आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटात सापडत आहे.

 

वाहनांची झपाट्याने वाढणारी संख्या, अतिवेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन, मद्यपान करून वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत किंवा संदेश पाठवत वाहन चालविणे, वाहन चालवताना चालकाला डुलकी लागणे, रस्त्याची सुरू असलेली कामे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर टाळणे, निकृष्ट रस्ते, धोकादायक वळणे, अपुरा प्रकाश, चुकीची ओव्हरटेकिंग आणि निष्काळजी वाहनचालक ही अपघातामागील प्रमुख कारणे आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, सन २०२४ (तात्पुरती आकडेवारी) मध्ये राज्यात ३६,०८४ रस्ते अपघात नोंदविण्यात आले. या अपघातांमध्ये १५,३३५ नागरिकांचा मृत्यू, तर ३०,७३० हून अधिक नागरिक जखमी झाले. यावरून राज्यात दररोज सरासरी ९९ अपघात, ४२ मृत्यू आणि ८४ जखमी होत असल्याचे दिसून येते.

यापूर्वी २०२३ मध्ये राज्यात ३५,२४३ अपघात, १५,३६६ मृत्यू आणि २९,७६४ जखमी नोंदविण्यात आले होते. यावरून अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होते. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग, शहरांतील गर्दीचे रस्ते तसेच ग्रामीण भागातील अरुंद व खराब रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण आहे. विशेषतः पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि इतर मोठ्या शहरांमध्ये वाहनांची वाढती संख्या ही मोठी समस्या ठरत आहे.

देशातील परिस्थिती आणखी भयावह

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये देशभरात सुमारे ४.८७ लाख रस्ते अपघात झाले. त्यामध्ये १,७७,१७५ नागरिकांचा मृत्यू, तर ४.७१ लाखांहून अधिक नागरिक जखमी झाले. याचा अर्थ भारतात दररोज सरासरी १,३३५ रस्ते अपघातात ४८५ मृत्यू झाले आहेत. तर १,२९० हून अधिक जखमी झाले आहेत. म्हणजेच प्रत्येक तासाला सरासरी ५६ अपघात आणि २० जणांचा मृत्यू होत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, भारत हा जगातील सर्वाधिक रस्ते अपघात होणाऱ्या देशांपैकी एक मानला जातो.

तरुणांचा सर्वाधिक बळी

रस्ते अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. हा वयोगट देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा मानला जातो. त्यामुळे या अपघातांमुळे देशाच्या उत्पादक मनुष्यबळाचे मोठे नुकसान होत आहे. देशातील रस्ते अपघातांमधील मृत्यूंपैकी सुमारे दोन तृतीयांश मृत्यू हे दुचाकीस्वार आणि पादचारी यांचे असल्याचे मंत्रालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हेल्मेट न वापरणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि रस्ता ओलांडताना निष्काळजीपणा ही प्रमुख कारणे आहेत.

अपघातांचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम

रस्ते अपघातामुळे केवळ जीवितहानी होत नाही, तर कुटुंबाच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन गमावले जाते. उपचारांवर लाखो रुपयांचा खर्च होतो. अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात, तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना आयुष्यभर अपंगत्वासह जगावे लागते. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होतो.

हे सुद्धा वाचा : तक्रार दिल्याचा राग, दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही; चाकू दाखवत दिल्या धमक्या

अपघात रोखण्यासाठी खालील उपायांची गरज

  • वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी
  • अतिवेगाविरोधात विशेष मोहीम
  • हेल्मेट आणि सीटबेल्ट सक्तीने वापरणे
  • मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाई
  • ब्लॅक स्पॉट्सची तातडीने दुरुस्ती
  • रस्त्यांची गुणवत्ता सुधारणे
  • शालेय स्तरापासून रस्ता सुरक्षा शिक्षण
  • वाहनचालकांचे नियमित प्रशिक्षण
  • सीसीटीव्ही आणि एआय-आधारित वाहतूक नियंत्रण व्यवस्था.
जनजागृतीची गरज

कायदे आणि दंड याबरोबरच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक वाहनचालकाने वेगमर्यादा पाळणे, हेल्मेट व सीटबेल्ट वापरणे, मद्यपान करून वाहन न चालविणे आणि मोबाईलचा वापर टाळणे, या साध्या नियमांचे पालन केल्यास हजारो जीव वाचू शकतात.

Web Title: There has been a significant increase in the number of road accidents in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण
1

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?
2

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?

कचरागाड्यांचा त्रास आटोक्यात आणा! उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश; कांजूर कचराभूमीबाबत सुनावणी
3

कचरागाड्यांचा त्रास आटोक्यात आणा! उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश; कांजूर कचराभूमीबाबत सुनावणी

PNG कनेक्शन घेणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; नव्या जोडणीवर मिळणार २०० SCM अतिरिक्त गॅस
4

PNG कनेक्शन घेणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; नव्या जोडणीवर मिळणार २०० SCM अतिरिक्त गॅस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.