Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किती आले अन् किती गेले, पण.. ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) कन्नड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजनांचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेतून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. किती आले किती गेले आणि कितीही आघाड्या झाल्या तरी एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना भारी असल्याचं शिंदे म्हणाले.

  • By Aparna
Updated On: May 26, 2023 | 03:57 PM
किती आले अन् किती गेले, पण.. ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा
Follow Us
Follow Us:

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) कन्नड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजनांचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेतून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. किती आले किती गेले आणि कितीही आघाड्या झाल्या तरी एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना भारी असल्याचं शिंदे म्हणाले.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, उद्या संसद भवनाचे उद्घाटन करायचे आहे. पण त्याला विरोध करण्यात येत आहे. संसद भवन पवित्र मंदिर आहे. तिथे सर्व खासदार जाऊन बसतात, जनतेचे प्रश्न मांडतात. हे तर ऐतिहासिक काम असून, याला काय विरोध करतात. याचा अर्थ ही पोटदुखी आहे. या कामाचे मोदींना श्रेय मिळेल म्हणून विरोधकांची पोटदुखी सुरु आहे. तर केजरीवाल मुंबईत येतात ते एकाला भेटतात, दुसऱ्याला भेटतात आणि दुसरे तिसऱ्याला तिसरे पाचव्याला भेटत आहेत. हे त्याच्या दारी आणि ते त्याच्या दारी जात आहेत. पण आपण कोणाच्या दारी जात नाही. त्यामुळे किती आले किती गेले आणि कितीही आघाड्या झाल्या तरी एकटे मोदी सर्वांना भारी असल्याचं शिंदे म्हणाले.

काँग्रेसचा कार्यक्रमावर आक्षेप
काँग्रेस कार्यकर्त्यांनी या उद्घाटन सोहळ्याबाबत आक्षेप घेतला आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेले असताना वारंवार असे कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. जनतेच्या पैशातून भाजप-सेनेचा प्रचार सुरू असून आधी 182 गावातील जनतेला 52 वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांचे उद्घाटन करून पाणी द्या अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. आज हे कार्यकर्ते शिर्डी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना कार्यक्रमस्थळी जाण्यापासून मज्जाव केलेला आहे.

Web Title: How many came and how many went but chief minister eknath shinde targets opponents nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2023 | 03:57 PM

Topics:  

  • aurangabad
  • Cm Eknath Shinde
  • Eknath Shinde
  • maharashtra

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
2

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
4

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.