Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Someshwar Sugar Factory Election Result: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने एकतर्फी बाजी मारल्याचे संकेत मिळत आहेत. एकूण २१ पैकी सर्व २१ जागांवर त्यांच्या पॅनेलच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 12, 2026 | 06:51 PM
'सोमेश्वर'मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत; पुरुषोत्तम जगतापांना मोठा धक्का

'सोमेश्वर'मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत; पुरुषोत्तम जगतापांना मोठा धक्का

Follow Us
Follow Us:
  • ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी!
  • २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
  • पुरुषोत्तम जगतापांच्या परिवर्तनाच्या दाव्याला धक्का
बारामती /सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या लक्षवेधी निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने एकतर्फी विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. सोमवारी (दि. १२) सायंकाळी सहा वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवून कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते अजित दादा पवार सोमेश्वर विकास पॅनेलसह युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री सोमेश्वर विकास पॅनेल’ची मोठी पीछेहाट झाली आहे. त्यामुळे जगताप यांच्या परिवर्तनाच्या दाव्याला मोठा धक्का बसला आहे. (Someshwar Sugar Factory Election Result)

संग्राम सोरटे यांनी १३३ पैकी ९३ मते

मतमोजणीच्या प्रारंभी ‘ब’ वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे संग्राम सोरटे यांनी १३३ पैकी ९३ मते मिळवत ॲड. महेश राणे यांचा पराभव केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाला वर्ष पूर्ण झाले नसल्याने गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी टाळण्यात आली.

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका

गट क्रमांक एकमधील नींबूत-खंडाळा मतदारसंघातून प्रमोद काकडे, अभिजित काकडे आणि डॉ. वसंतराव दगडे यांनी साडे आठ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला. गट क्रमांक दोनमधील मुरूम-वाल्हे मतदारसंघात कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, विक्रम भोसले आणि ऋषिकेश गायकवाड यांनी ६ हजार ५७२ मताधिक्याने बाजी मारली. डॉ. दगडे यांना पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचा पाठिंबा होता.

निवडणुकीत ८३ उमेदवार रिंगणात

या निवडणुकीत ८४ टक्के मतदान झाले होते. बारामती, पुरंदर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा आणि फलटण या भागांत कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीत ८३ उमेदवार रिंगणात होते. पुरुषोत्तम जगताप यांनी ऐनवेळी स्वतंत्र पॅनेल उभे केले, तर युगेंद्र पवार यांनीही स्वतंत्र आव्हान दिले. जगताप यांच्या पॅनेलला भाजपचे माजी आमदार संजय जगताप यांनी पाठिंबा दिला होता. दुसरीकडे, आमदार विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलला साथ दिली.

निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी बारामतीत तळ ठोकून प्रचारयंत्रणा सक्रिय ठेवली होती. अजितदादांच्या रणनीतीचा अवलंब करत राष्ट्रवादीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोट बांधली. विरोधी पॅनेलचे पाच ते सहा उमेदवार विजयी होतील, असा अंदाज व्यक्त होत असतानाच मतमोजणीतील कल राष्ट्रवादीच्या बाजूने झुकला.

सायंकाळी सहा वाजेपर्यंत पहिल्या दोन गटांसह ‘ब’ वर्ग मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला होता. उर्वरित मतमोजणीला विलंब होत असल्याने मध्यरात्रीनंतरही प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता होती.

India Alliance : ज्ञानेश कुमार ‘गो बॅक’; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश

Web Title: Someshwar sugar factory election sunetra pawar panel leads all 21 seats purushottam jagtap sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • baramati
  • political news
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
1

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
2

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
3

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
4

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.