मुंबई – ऐन दसरा मेळाव्याच्या तोडांवर शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरळी कोळीवाड्यातून जवळपास ५०० कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत कोळी बांधवांनी वर्षा या निवासस्थानी जात प्रवेश घेतला. हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत सुरू झालेली गळती रोखण्याचे मोठे आव्हान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यापुढे आहे. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरून पक्षाला गळती लागू नये, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र तरीही आदित्य ठाकरेंना यासाठी यश येत नाहीये.
वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र त्यांना याच मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. आज शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऐन दसरा मेळाव्याच्या तोंडावर शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले आहेत.