Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; पंचायत समिती सदस्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

विजयदुर्ग परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (उबाठा) मोठा धक्का देत पंचायत समिती सदस्य विष्णू गाडी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 01, 2026 | 12:30 AM
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; पंचायत समिती सदस्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; पंचायत समिती सदस्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Follow Us
Follow Us:

देवगड : विजयदुर्ग परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (उबाठा) मोठा धक्का देत पंचायत समिती सदस्य विष्णू गाडी, तालुकाप्रमुख जयेश नर, पुरळ विभाग प्रमुख संदीप डोळकर, मणचे गावचे सरपंच दीपक तोरस्कर, गिर्ये ग्रामपंचायत सदस्य विनोद गावकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपा नेते मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी भाजपाचे मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर, महिला व बालकल्याण सभापती नारकर, पंचायत समिती सदस्य चव्हाण माजी सभापती रवी पाळेकर यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

पक्षप्रवेश सोहळ्यानंतर बोलताना नितेश राणे म्हणाले, गाव, वाडी, तालुका आणि जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे जनतेला चांगल्या प्रकारे समजले आहे. त्यामुळे विविध पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांचा वाढता विश्वास ही भाजपची सर्वात मोठी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.

नव्या कार्यकर्त्यांना सन्मानाची हमी

भाजपामध्ये प्रवेश केलेल्या विष्णू गाडी, जयेश नर, संदीप डोळकर व इतर कार्यकर्त्यांचे स्वागत करताना राणे यांनी त्यांच्या राजकीय भवितव्याची जबाबदारी पक्ष घेईल, असा विश्वास दिला. कार्यकर्त्यांचा सन्मान, त्यांचे नेतृत्व घडविणे आणि त्यांना काम करण्याची संधी देणे ही भाजपाची संस्कृती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात नव्याने दाखल झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य मान-सन्मान मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्गात रोजगाराच्या मोठ्या संधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या काळात हजारो कोटी रुपयांचे औद्योगिक प्रकल्प येणार असल्याचा दावा करत राणे म्हणाले की, या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. रोजगारासाठी मुंबई, पुणे, नाशिक किंवा परराज्यात गेलेल्या युवकांना भविष्यात आपल्या गावातच रोजगार उपलब्ध होईल. जिल्ह्यातील विकास आणि रोजगार वाढीसाठी राज्य व केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

पर्यावरणपूरक विकासावर भर

कोकणातील प्रस्तावित प्रकल्पांबाबत बोलताना राणे यांनी सर्व प्रकल्प पर्यावरणपूरक असतील, अशी ग्वाही दिली. कोकणचा निसर्ग, आंबा, काजू आणि शेती यांना कोणताही धोका पोहोचणार नाही, याची सरकार काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखूनच प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा : अंतरवाली सराटीतून परतताना भीषण अपघात; उभ्या ट्रकला कारची धडक, इंदापूरच्या मराठा आंदोलकाचा मृत्यू, दोघे गंभीर

विजयदुर्ग परिसरात भाजपाची ताकद वाढली

विजयदुर्ग परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे. उबाठा गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. विजयदुर्ग भागात भाजपला अधिक बळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Web Title: Hundreds of workers from uddhav thackerays shiv sena have joined the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • BJP
  • MLA Nitesh Rane
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका
1

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका

Bharat Gogawale : ‘रायगडचं डिक्लेरेशन घेण्यासाठी..’; भरत गोगावलेंची मिश्किल टिप्पणी, पालकमंत्रिपदावरून महायुतीत पुन्हा धुसफूस
2

Bharat Gogawale : ‘रायगडचं डिक्लेरेशन घेण्यासाठी..’; भरत गोगावलेंची मिश्किल टिप्पणी, पालकमंत्रिपदावरून महायुतीत पुन्हा धुसफूस

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका
3

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का
4

Shivsena News : विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द; सहा वर्षांची निवडणूक बंदी, ठाकरे गटाला मोठा धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.