Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जिवंतपणीही सुरक्षितता नाही, मृत्यूनंतरही नाही’; अंत्यसंस्कार सुरू असतानाच स्मशानभूमीतील चिमणी कोसळली, शिवसेनेचा MBMC ला इशारा

मीरा-भाईंदरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच चिमणी कोसळल्याने महापालिकेच्या निष्काळजी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर मनसेनंतर आता शिवसेनेनेही महापालिकेविरोधात आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. "जिवंत असतानाही सुरक्षितता नाही आणि मृत्यूनंतरही नाही,"

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 15, 2026 | 04:26 PM
'जिवंतपणीही सुरक्षितता नाही, मृत्यूनंतरही नाही'; अंत्यसंस्कार सुरू असतानाच स्मशानभूमीतील चिमणी कोसळली, शिवसेनेचा MBMC ला इशारा

'जिवंतपणीही सुरक्षितता नाही, मृत्यूनंतरही नाही'; अंत्यसंस्कार सुरू असतानाच स्मशानभूमीतील चिमणी कोसळली, शिवसेनेचा MBMC ला इशारा

Follow Us
Follow Us:
  • अंत्यसंस्कार सुरू असतानाच स्मशानभूमीतील चिमणी कोसळली
  • मीरा-भाईंदर महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा कळस!
  • मनसेनंतर शिवसेनाही आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा
विजय काते, भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निष्काळजी, बेजबाबदार आणि भोंगळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक नमुना मंगळवारी मीरा रोड येथील स्मशानभूमीत पाहायला मिळाला. एका व्यक्तीचे अंत्यसंस्कार सुरू असतानाच स्मशानभूमीतील उंच चिमणीचा काही भाग अचानक कोसळल्याने उपस्थित नातेवाईक, नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने चिमणीचा ढिगारा कोणाच्याही अंगावर न पडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, काही सेकंदांचा फरक पडला असता तर ही घटना भीषण दुर्घटनेत बदलली असती.

या घटनेमुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षेविषयीच्या दाव्यांचा फोलपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात उघडी चेंबर्स, खड्डेमय रस्ते, मोडकळीस आलेल्या सार्वजनिक सुविधा, धोकादायक इमारती आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिक आधीच त्रस्त असताना आता स्मशानभूमीसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणीही सुरक्षिततेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

MIRA BHAYANDAR: काशिमीरा परिसरात पार्किंगच्या वादातून गुंडगिरी; तरुण आणि आईवर जीवघेणा हल्ला

या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेचा तीव्र निषेध करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाली असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, “मीरा-भाईंदरमध्ये नागरिकांच्या जीवाची कोणतीही किंमत राहिलेली नाही. जिवंत असताना नागरिकांना रस्ते, चेंबर्स, इमारती आणि विविध धोकादायक परिस्थितींना सामोरे जावे लागत आहे. आता मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल, तर यापेक्षा मोठे प्रशासनाचे अपयश कोणते? महापालिकेचा हा हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा आम्ही अजिबात सहन करणार नाही.”

पदाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, स्मशानभूमीतील सर्व संरचनांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी आणि शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा तपासणी तात्काळ करण्यात यावी. अन्यथा शिवसेना जनतेसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

या घटनेमुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली, तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

MIRA BHAYNDAR : मिरा-भाईंदरमध्ये पावसाचा कहर; आपत्ती व्यवस्थापन विभागावर प्रश्नचिन्ह

Web Title: Mira bhayandar crematorium chimney collapse shiv sena mns protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • MNS
  • shivsena

संबंधित बातम्या

Seva Sankalp Campaign :  शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन
1

Seva Sankalp Campaign : शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप
2

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण
3

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज
4

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.