Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajan Salvi: “मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे…”, राजन साळवी पक्षांतरावर स्पष्टच बोलले

माजी आमदार राजन साळवी हे लवकरच उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर अखेर राजन साळवी यांनी मौन सोडलं असून माध्यमांसमोर येत त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 02, 2025 | 11:40 AM
“मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे…", राजन साळवी पक्षांतरावर स्पष्टच बोलले (फोटो सौजन्य-X)

“मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे…", राजन साळवी पक्षांतरावर स्पष्टच बोलले (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Uddhav Thackeray and Rajan Salvi : कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले राजन साळवी यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे एसीबीच्या रडारवर असलेले आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राजन साळवी यांच्यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे ते लवकरच पक्ष सोडून इतर पक्षात स्थायिक होणार असल्याच्याही चर्चेला जोर आला होता. मात्र आता या सर्व चर्चांवर राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही यावर स्पष्टच बोलले आहेत.

‘ठाकरे यांचा निष्ठावान सैनिक म्हणून माझी ओळख आहे. 2024 च्या पराभवाला आम्ही सामोरे गेलो आहोत. पराभवाचे दु:ख, खंत आणि वेदना माझ्यासकट मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला जाणवत आहे. पराभवाची खंत असताना शिवसेना भविष्याकडे वाटचाल करत आहे. भाजपा किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसं काही नाही. माझ्या रोजच्या कामात माझं मार्गक्रमण सुरू आहे. अशातऱ्हेच्या बातम्या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार. यात कोणतीही शंका नाही”, असं राजन साळवी म्हणाले.

Top Marathi News today Live : कल्याण घटनेतील आरोपी विशाल गवळीला आज कल्याण न्यायालयात हजर करणार

“मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे हे मला तुमच्या माध्यमातून समजतय. पण या सर्व अफवा आहेत. मी निष्ठावंत सैनिक आहे. बाळासाहेबांचाच सैनिक राहणार. या बाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही” असं राजन साळवी म्हणाले. भाजपकडून ऑफर आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारणारच. तसा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असू शकतो. ते भाजप नेत्यांच मत आहे”

निवडणुकीनंतर वरिष्ठांनी संपर्क केला का?

पराभवानंतर पक्षश्रेष्ठींशी संपर्क होऊ न शकल्याने राजन साळवी नाराज असल्याची चर्चा होती. या चर्चेवर राजन साळवी म्हणाले, “पराभवनानंयतर मुंबईतील मातोश्री येथे पराभूत उमेदवारांची बैठक घेतली होती. तिथे पराभवाचं कारण आणि आत्मचिंतन करण्यात आलं. तेच आमच्यादृष्टीने महत्त्वाचं आहे.”

एसीबीच्या तपासामुळे टांगती तलवार

“एसीबीची चौकशी सुरू होती. याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्याकडून निर्णय सुट्टीनंतर अपेक्षित आहे. आमच्यावर टांगती तलवार आहे, हे मला निश्चितपणे माहितेय”, असंही ते पुढे म्हणाले.

तसेच राजन साळवी येणार असून त्यांचे स्वागत असल्याचे शिवसेनेचे शिंदे गटाचे आबिटकर यांनी सांगितले. यावर साळवी म्हणाले, “शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वागताची भावना असते. मी मतदारसंघात संघटन कौशल्यावर काम केलय. त्या भावनेने ते बोलत असतील” उद्धव ठाकरे गटातील निवडून आलेले आमदार, माजी आमदार शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहे असं नरेश म्हस्के म्हणाले. या प्रश्नाव राजन साळवी म्हणाले की, “ते त्यांचं व्यक्तीगत मत असेल. मी माझ्या भावना सांगितल्या आहेत. माझ्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत. मी माझ्या मतदारसंघात रोजच्या पद्धतीने काम करत आहे”.

Santosh Deshmukh Case : मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊटर…; बड्या नेत्याचा गंभीर दावा

Web Title: I will not left uddhav thackeray party join bjp former kokan rajapur mla rajan salvi clear his stand news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • BJP
  • Rajan Salvi
  • Shiv Sena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
1

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
3

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
4

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.