वाल्मिक कराडचा आणखी एक क्रूर चेहरा उघड; मुंडे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शीचाही खून (Photo Credit- Social Media)
मुंबई : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन राजकारण रंगले आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आता जवळपास महिना होत आला असला तरी सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. मात्र मास्टर माईंड म्हणून चर्चेत असलेला वाल्मिक कराड याने अचानक सरेंडर केले. पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये स्वतःच्या गाडीने येत त्याने आत्मसमर्पण केले. त्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल केला. यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरुन कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बडा दावा केला आहे.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बीडमधील पोलीस ठाण्यामध्ये नवीन पलंग आणल्यामुळे टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याचे लाड पुरवले जात आहे. त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आले. त्यावर पोलिसांसाठी बेड आणल्याचा खुलासा केला. पण यापूर्वी कधी पोलीस ठाण्यात बेड आणले गेले नाही. पोलीस आतापर्यंत कधी कॉटवर झोपले नाही. मग हे कोणाचे लाड करत आहे. पोलीस कोठडीत वाल्मिक कराड याला झोपवण्यासाठी ते कॉट आणले गेले काय, याची चौकशी झाली पाहिजे,”अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
विजय वड्डेटीवार यांनी पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याचा हवाला देऊन गंभीर दावा केला आहे. ते म्हणाले, “मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊटर होऊ शकतो. त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्याचा एन्काऊंटर करु नका. त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. आपण कराडचे एन्काऊटर करण्याची माहिती उच्चपदस्त अधिकाऱ्याने दिल्याचा दावा त्यांनी केला”. विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर होणार असल्याचा बडा दावा केला आहे.
महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का?
वाल्मीक कराड पोलीस कोठडी मध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात.
आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित… pic.twitter.com/43E58PljRO
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 2, 2025
विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन देखील बीड प्रकरणावरुन रोष व्यक्त केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मीक कराड पोलीस कोठडी मध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात.
महाराष्ट्र संबंधित बात म्या वाचण्यासाठी क्लिक करा
आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण सगळच मिळेल! वाल्मीक कराड वर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराड वर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. कराड वर अजून ही संतोष देशमुख हत्या असो की मकोका अंतर्गत गुन्हा ही दाखल झालेलं नाही, त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे! अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.