Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अकाली निधनाने वस्त्रोद्योगाचे पाठबळ हरपले; इचलकरंजीला दिले झुकते माप

इचलकरंजीवर नेहमी प्रेम करणारे विविध विषयात झोपडपट्टीचा विषय असो, पाण्याचा विषय असो, आ.जी.एम.चा विषय असो, झेड.एल.डी. च्या विषयासंदर्भात त्यांनी नेहमीच इचलकरंजीला झुकते माप दिले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 29, 2026 | 05:27 PM
Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अकाली निधनाने वस्त्रोद्योगाचे पाठबळ हरपले; इचलकरंजीला दिले झुकते माप
Follow Us
Follow Us:

अजित पवार यांचे अपघाती निधन
यंत्रमाग उद्योगाला पाठबळ देणारा नेता हरपला
वस्त्रो्योगाकडे डोळस नजरेने पाहणारा नेता म्हणून ओळख

इचलकरंजी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे (ichalkaranji)  वस्त्रोद्योग क्षेत्राची व खासकरून यंत्रमाग उद्योगाला पाठबळ देणारा नेता हरपला, अशी भावना वस्त्रनगरीतून व्यक्त केली जात आहे. वस्त्रो्योगाकडे डोळस नजरेने पाहणारा व नेहमी पाठिशी राहणारा नेता हरपल्याची भावना संपूर्ण इचलकरंजीकरांची आहे. त्यांना इचलकरंजीतील तमाम यंत्रमागधारकांच्याकडून व दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

नेहमी महाराष्ट्रामध्ये वस्त्रोद्योग व यंत्रमाग उद्योगाला अर्थमंत्री असणाऱ्या अजित पवार यांनी पाठबळ दिलेले आहे. वेगवेगळ्या योजना करताना नेहमीच ते सकारात्कम असत. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाकडे त्यांचे खास लक्ष असायचे. वस्त्रोद्योगातील कोणताही प्रश्न घेऊन गेल्यास त्वरीत त्यामध्ये लक्ष घालून तो प्रश्न सोडविण्याकडे त्यांचा कल असायचा किंवा इतर विभागाकडे असेल तर ते लगेचच फोन करून संबंधीत मंत्र्यांना सुचना करीत.

Sunetra Pawar: अजितदादांनंतर राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारांकडे? नरहरी झिरवाळ यांनी थेट मांडला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव

यंत्रमाग उद्योगाचा १ रुपये व ७५ पैशांचा अतिरिक्त वीज सवलतीचा निर्णय प्रलंबित होता. तो प्रश्न त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी त्वरीत त्याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना संबंधित सचिवांना दिल्या व दुसऱ्याच दिवशी होणाऱ्या कॅबिनेट मिटींगमध्ये तो विषय संमत करून घेण्ाविषयी सांगितले. यानंतरही संबंधीत अधिकाऱ्यांनी ती योजना फक्त ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असेल असा मसुदा तयार केला होता. त्यासंदर्भात पुन्हा दादांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्या अधिकाऱ्यांना झापले व कायमस्वरूपी ही योजना चालू राहील असा प्रस्ताव करण्यासंदर्भात आदेश दिले होते.

छोट्या कार्यकर्त्यालाही मोठेपणाने वागवणारे नेतृत्व हरपले; शरद बुट्टे पाटील यांची अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली

नेहमीच इचलकरंजीला झुकते माप
इचलकरंजीवर नेहमी प्रेम करणारे विविध विषयात झोपडपट्टीचा विषय असो, पाण्याचा विषय असो, आ.जी.एम.चा विषय असो, झेड.एल.डी. च्या विषयासंदर्भात त्यांनी नेहमीच इचलकरंजीला झुकते माप दिले आहे. त्याचबरोबरीने काही महिन्यांपूर्वी झालेल्या भाई नेरूरकर चषक खो-खो स्पर्धेसाठी शासनाकडून भरीव आर्थीक तरतूद करून इचलकरंजीला या स्पर्धा व्हाव्यात यासाठी मदत केली होती. तसेच बक्षिस वितरण समारंभाला स्वत: हजर राहून फाईनलचा सामना ग्राऊंडवर बसुन त्यांनी पाहिला. या आठवणी ताज्या असताना अजितदादांचे अचानक निघून जाणे हृदयविदारक आहे.

अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. छोट्या कार्यकर्त्यालाही प्रोत्साहन देणारे, कडक स्वभावामागे अपार प्रेम जपणारे आणि शब्दांइतकेच कृतीत ठाम असलेले नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Web Title: Ichalkaranji tribute to dcm ajit pawar death in baramati plane crash marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Ichalkaranji
  • Ichalkaranji News

संबंधित बातम्या

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
1

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक
2

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.