अजितदादांनंतर राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारांकडे? नरहरी झिरवाळ यांनी थेट मांडला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव (Photo Credit- X)
दरम्यान, या सगळ्या दुखवट्यानंतर राजकीय च्रक भिरताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केलीये. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव आघाडीवर असल्याचे समजले जात आहे. तसेच, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची घेतली भेट घेतली आहे.
खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांच्या अंत्यविधीवेळी सुनेत्रा पवार यांनी साश्रू नयनांनी भावनिक निरोप दिला आहे. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबाने अत्यंत जड अंतःकरणाने अजित पवारांना निरोप दिला आहे.
अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमानतळावर लँडिंगदरम्यान चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. या दुर्घटनेत पवारांचे सुरक्षा रक्षक, दोन पायलट आणि एक महिला क्रू मेंबरसह एकूण ५ जणांना जीव गमवावा लागला. बारामतीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत लाखोंच्या संख्येने जनसुमदाय लोटला होता. पवार कुटुंबासाठी देखील ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आहे. संपूर्ण पवार कुटुंब, बारामतीकर एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागिरक दादांच्या जाण्यामुळे शोकाकुल झाले. अनेक दिग्गज नेत्यांनी बारामती येथे जाऊन अजित पवारांचे अंत्यदर्शन घेतले. पवार कुटुंबियांची भेट त्यांचे सांत्वन केले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह हे देखील बारामतीमध्ये दाखल झाले होते.






