Tuljapur News: तुळजापूरमध्ये अवैध धंदे वाढले; नगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा
हे देखील वाचा: Latur News: लातूरमध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला! 10 सरपंच आणि 58 सदस्यपदांसाठी 28 एप्रिलला मतदान
अवैध शस्त्रप्रकरणाची त्वरित चौकशी करा. तुळजापूर शहरात अवैध गावठी पिस्तूल प्रकरणातही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत दोन ठिकाणी फायरिंगच्या घटना घडल्या असून आठवडा बाजार परिसरात गावठी बंदुकीसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. अवैध धंद्यांच्या सूत्रधारांवर कारवाई करा अशी मागणी होताना दिसून येत आहे. मटका, तिरट जुगार, चक्री, गुटखा, अवैध दारू, गांजा तसेच देहविक्रीचे प्रकार खुलेआम सुरू असून पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
हे देखील वाचा: भोंदूबाबा अशोक खरातवर उद्धव ठाकरेंकडून लाभाची खैरात; शेतकऱ्यांसाठीचे पाणी ‘शिवनिका’ संस्थेकडे वळवले
केवळ किरकोळ व्यक्तींवर कारवाई न करता या अवैध धंद्यांच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर औदुंबर कदम, किशोर साठे, नरेश अमृतराव, माऊली भोसले, सादर कदम, रत्नदीप भोसले, लखन पेंदे, दिनेश शिरसागर, पंडित जगदाळे, अजित परमेश्वर, आनंद सावंत, विजय कंदले, विशाल रोजकरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आली आहे. भाविकांच्या मनातील शहराची प्रतिमा धोक्यात असल्याचे स्थानिक नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे तुळजापूर अवैध धंद्यांविरोधात आंदोलनाची तयारी करणार असल्याचे सांगितले जात आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






