हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करावा. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे बदाम. सुका मेवा खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. सकाळच्या नाश्त्यात नियमित ४ ते ५ भिजवलेले बदाम खाल्ल्यास महिनाभरात चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल आणि शरीराला सुद्धा फायदे होतील. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती काहीशी कमी होऊन जाते. यामुळे सतत थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. या सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित बदाम खावेत. चला तर जाणून घेऊया बदाम खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
Almond हिवाळ्यात या पद्धतीने करा बदामाचे सेवन, आरोग्य सुधारण्यासोबतच चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

बदाम शरीरासाठी सुपरफूड मानले जाते. यामध्ये प्रथिने, फायबर, विटामिन ई, मॅग्नेशियम आणि निरोगी फॅट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात.

खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी डॉक्टरसुद्धा बदाम खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

विटामिन ई आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार राहते आणि केस सुद्धा मऊ आणि हेल्दी होतात. महिनाभर नियमित भिजवलेले बदाम खाल्ल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील.

भिजवलेले बदाम पचायला अतिशय हलके असतात. बद्धकोष्ठता आणि पचनाच्या इतर समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी भिजवलेले बदाम खावेत.

विटामिन ई, अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा फॅटी ॲसिड्स मेंदूची कार्यक्षमता वाढवतात आणि एकाग्रता सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे नियमित बदाम खावेत.






