महाराष्ट्राला शक्ती चक्रीवादळचा धोका वाढला
पुढील दिवस राज्याला मुसळधार पावसाचा इशारा
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
Maharashtra Weather Update: यावर्षी राज्याला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. गेले काही दिवस राज्याला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आता ऑक्टोबर महिना आला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये.
राज्याला शक्ती चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यावर पावसाचे संकट कायम आहे. एक मोठे संकट महराष्ट्राच्या दिशेने येत आहे. हवामान विभागाने राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळचा धोका निर्माण झाला आहे.
Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन
हवामान विभगाने कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, मुंबई, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे आहेत. पुढील दोन दिवसांत शक्ती चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे.
शक्ती चक्रीवादळ वेगाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे सरकत असल्याचे समोर आले आहे. कोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमार बांधवांना खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात यंदा मान्सून चांगलाच लांबला आहे. मे महिन्याच्या मध्यातच यावेळी पावसाळा सुरुवात झाली. पावसाळ्याच्या आधी सुरू झालेला पुस पावसाळासंपला तरी अजून जायचे नाव घेताना दिसून येत नाहीये. कारण जोरदार पावसामुळे महाराष्ट्रात जोरदार धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Maharashtra Rain Alert: यंदा आणा वॉटरप्रूफ पणत्या! कारण पाऊस ऑक्टोबरमध्ये …; चिंता वाढली
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळा पोषक हवामान तयार झाले आहे. हवामानात हॉट असणाऱ्या बदलांमुळे सप्टेंबर महिना संपला तरी देखील पावसाळा संपलेला नाही. ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा देखील चिंतेत सापडला आहे. राज्यावरील पावसाचा धोका अजून टळलेला नाही. पुढील काही तासांमध्ये आणि पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.