Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोशीमध्ये दोन कंपन्यांना भीषण आग, आगीत दोन कंपन्या जळून खाक

पिंपरी चिंचवड मधील मोशीमध्ये शुक्रवारी सकाळी 7 वाजता दोन कंपन्यांना भीषण आग लागली. या आगीत दोन्हीही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. कंपनी मालकांच्या म्हणण्याप्रमाणे अंदाजे एकूण 3.5 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 17, 2022 | 03:02 PM
मोशीमध्ये दोन कंपन्यांना भीषण आग, आगीत दोन कंपन्या जळून खाक
Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील मोशीमध्ये शुक्रवारी सकाळी 7 वाजता दोन कंपन्यांना भीषण आग लागली. या आगीत दोन्हीही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. कंपनी मालकांच्या म्हणण्याप्रमाणे अंदाजे एकूण 3.5 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन सिलेंडरचे स्फोट झाल्याने ही आग लागली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख अग्निशमन विमोचक बाळासाहेब वैद्य यांनी दिली.

ही आग ‘अमिगा टेकनॉक्राफ्ट’ आणि ‘एसपीए इंजिनीरिंग’ या दोन कंपन्यांना लागली होती. त्याबद्दल एका व्यक्तीने सकाळी 7 वाजता अग्निशमन विभागाला फोन करून कळवले. या कंपन्या पुणे-नाशिक हायवेवरील जय गणेश साम्राज्य चौककडून चऱ्होलीला जाणाऱ्या रस्त्याजवळ आहेत. ही आग भीषण असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे 7 बंब घटनास्थळी पोहोचले होते. यामध्ये मुख्य केंद्राचे 2 बंब व भोसरी, प्राधिकरण, तळवडे, चिखली व थेरगाव केंद्राचे प्रत्येकी एक बंब होते. तसेच, 22 ते 23 कर्मचारीही होते.

अमिगा टेकनॉक्राफ्ट कंपनीमधील मशीनरी, लॅपटॉप्स, कॉम्प्युटर्स, इलेक्ट्रिकल वायरिंग व इतर साहित्य जळून खाक झाले. कंपनीचे मालकानुसार अंदाजे 1.5 कोटीचे नुकसान झाले आहे. तर, एसपीए इंजिनीरिंग कंपनीमधील मशीनरी, लेथ मशीन, ड्रिलिंग मशीन, सिएनसि मशीन, व्हीएमसि मशीन, तयार माल व कच्चा माल जळून खाक झाला आहे. कंपनी मालकानुसार या आगीत त्याचे अंदाजे 2 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

[read_also content=”गृहमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्यामुळे अमन मार्च तूर्तास स्थगित : ॲड. प्रकाश आंबेडकर https://www.navarashtra.com/maharashtra/aman-march-postponed-till-home-minister-agrees-to-demands-adv-prakash-ambedkar-nrdm-293581.html”]

अग्निशमन विभागाचे कर्मचारी या कंपनीबाहेर पोहोचताच आणखी दोन सिलेंडरचे स्फोट झाले. यातील एक सिलेंडर कंपनीचे शेडचे छत तोडून 200 ते 250 मीटर दूर उडून पुणे-नाशिक हायवेजवळ पडला. कंपनीबाहेर पार्क केलेली MH14 DQ 9265 या दुचाकीला आग लागून ती खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: In moses two companies were burned to death nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2022 | 03:02 PM

Topics:  

  • moshi
  • NAVARASHTRA
  • Pimpri
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
1

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
2

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
3

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
4

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.