पुणे पोलीस ॲक्शन मोडवर, दारू पिऊन गाडी चालवू नका; नाहीतर…
काय घडलं नेमकं?
शनिवारी सायंकाळी तुकाराम गव्हाणे हे उंडणगाव येथे मक्याचे पैसे घेण्यासाठी गेले होते. पैसे घेऊन दुचाकीवरून परतत असतांना वाटेत त्यांचे अपहरण आरोपींनी केले. मध्यरात्री गव्हाणे यांच्याच मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन आला. अपहरणकर्त्यांनी तुकाराम गव्हाणे यांच्या सुटकेसाठी १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या फोनमुळे गव्हाणे कुटुंबीय हादरून गेले. मुलाने तातडीने अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला. आज सकाळी कन्नड घाटात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तिथे शोध घेतला असता एका खोल दरीत गव्हाणे यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. दरी अत्यंत खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठे परिश्रम घ्यावे लागले.
५ आरोपींना अटक
कन्नड पोलिसांनी या प्रकरणी 5 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी गव्हाणे यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दरीत फेकल्याची कबुली दिली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.
हुंड्याचा कहर! 5 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटने उघड केलं सत्य
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गर्भवती महिलेने हुंड्याच्या छळाला त्रासून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आयशा अरबाज शेख असे आहे. आयशा अवघे २३ वर्षांची होती आणि ती पाच महिन्यांची गर्भवती होती. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनने परिसरात शोककळा पसरली आहे.
Ans: मक्याचे पैसे घेऊन दुचाकीने परतत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले.
Ans: अपहरणकर्त्यांनी गव्हाणेंच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला 1 कोटींची खंडणी मागितली.
Ans: कन्नड घाटात मृतदेह सापडला असून 5 संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू आहे.






