Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरेंची तिरपी चाल; देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मनसेचा उमेदवार मैदानात

राज ठाकरेंनी अमरावती दौरा आटोपल्यानंतर नागपूर विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच, अमरावती आणि नागपूर विभागातील 11 जिल्ह्याचा दौरा दोन दिवसांत पूर्ण करुन ते मुंबईकडे रवाना झाले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी नागपूर आणि नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी केल्याची माहिती आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 29, 2024 | 12:07 PM
राज ठाकरेंची तिरपी चाल; देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मनसेचा उमेदवार मैदानात
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला. या दौऱ्या पूर्वीही त्यांनी काही उमेदवारांच्या नावांचा घोषणा केली होती. त्यानंतरही त्यांनी नुकताच विदर्भाचा दुसऱ्या टप्प्यातील दौरा केला. विदर्भाच्या दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्यात त्यांनी काही उमेदवारांची चाचपणी केली. या दौऱ्यातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.  नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याविरोधात मनसेचा उमेदवार निश्चित केल्याची बातमी समोर आली आहे.

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून त्यांनी मनसेचे 7 उमेदवारही जाहीर केले आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर त्यांनी  गोंदिया, भंडाऱ्यातून विदर्भाच्या दौऱ्याला सुरूवात केली. त्यावेळी त्यांनी चंद्रपुरातून मनसेच्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. याशिवाय वणी मतदारसंघातही उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे विदर्भाच्या दौऱ्यात राज ठाकरेंनी जवळपास तीन उमेदवारांची घोषणा केली. म्हणजेच आता मनसेचे जवळपास सात उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

हेही वाचा: डोळ्यात चटणी टाकून दागिने चाेरणाऱ्यांना ठाेकल्या बेड्या; पंढरपूर पोलिसांची कारवाई

अशातच राज ठाकरेंच्या विदर्भाच्या दौऱ्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मनसेने आपला उमेदवार जवळपास निश्चित केल्याची माहिती आहे.  नागपूरचे मनसेचे नेते तुषार गिरे यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध राज ठाकरेंचा उमेदवार निवडणुकीच्या मैदाना उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहेत.

राज ठाकरेंनी अमरावती दौरा आटोपल्यानंतर नागपूर विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच, अमरावती आणि नागपूर विभागातील 11 जिल्ह्याचा दौरा दोन दिवसांत पूर्ण करुन ते मुंबईकडे रवाना झाले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी नागपूर आणि नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी केल्याची माहिती आहे.

हेही वाचा: या झाडांना वाढवण्यासाठी मुळांची गरज भासणार नाही, सुंदर झाडे फक्त पानांपासून वाढवा घरी

दरम्यान, लोकसभा निवडणुकीदम्यान, राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीत मात्र राज ठाकरेंनी वेगळे लढण्याची भूमिका स्वीकारली आहे. आजपासून राज ठाकरे दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत मनसेचे विदर्भ प्रमुख राजू उंबरकर यांनी माहिती दिली.नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून तुषार गिरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. नवरात्री उत्सवानंतर मनसेकडून पुढील उमेदवारांची घोषणा केली जाईल. त्यामध्ये तुषार गिरेंच्या उमेदवारीची घोषणा केली जाईल. तुषार गिरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांना आव्हान देतील

Web Title: In nagpur the mns candidate will challenge devendra fadnavis in the election arena nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 12:07 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Maharashtra Assembly election 2024
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Tourism :-  विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले विकासासाठी ९९३ कोटी : मुख्यमंत्री
1

Maharashtra Tourism :- विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले विकासासाठी ९९३ कोटी : मुख्यमंत्री

ठाकरे गटाकडून समृद्धी महामार्गावर कांदा प्रश्नासाठी आंदोलन, ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदीची मागणी, पोलिसांकडून अंबादास दानवे ताब्यात
2

ठाकरे गटाकडून समृद्धी महामार्गावर कांदा प्रश्नासाठी आंदोलन, ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदीची मागणी, पोलिसांकडून अंबादास दानवे ताब्यात

मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवाडांच्या आरोपांमुळे खळबळ
3

मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवाडांच्या आरोपांमुळे खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.