Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर! कोपरगावात ६४ सदनिकांच्या वसाहतीचे उद्घाटन

तालुका पोलीस स्टेशन इमारत आणि पोलीस कर्मचारी वसाहती व्हावी यासाठी तालुक्यामध्ये अजूनही कायदा सुव्यवस्थेचा आणि अवैध धंद्यांचा प्रश्न शिल्लक आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 05, 2026 | 03:52 PM
Kopargaon Police Station,

Kopargaon Police Station,

Follow Us
Close
Follow Us:
  • तालुका पोलीस स्टेशन आणि ६४ कर्मचाऱ्यांची निवासी वसाहत
  • तपासासाठी विशेष ‘फॉरेन्सिक व्हॅन’ उपलब्ध
  • २०१३ मध्ये माजी आमदार अशोकराव काळे यांनी शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे स्वतंत्र केले होते.
Ahilya nagar News: कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन इमारत केवळ विटा आणि सिमेंटची रचना नाही तर ती आपल्या सुरक्षितेची हमी आहे. उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार कोपरगावच्या दौऱ्यावर असताना पोलिस स्टेशन व वसाहतीची हलाकीची परिस्थिती दाखवून जनतेची सेवा करणाऱ्या बांधवांना नवीन पोलिस स्टेशन आणि राहण्यासाठी नवीन वसाहत इमारतीची मागणी केली. त्यांनी मंत्रालयात बैठक बोलावली आणि लगेच दोन्ही इमारतीसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून कोपरगाव तालुका व ६४ कर्मचारी वसाहत इमारतीने कोपरगाव शहराच्या वैभवात भर टाकली, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

धरणग्रस्तांना मोठा दिलासा; उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ

कोपरगावात दोन वेगवेगळी पोलिस ठाणी

कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन व ६४ पोलीस कर्मचारी वसाहत इमारतीचे आणि फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. ३ रोजी पोलीस स्टेशन परिसरात उत्साहात पार पडले, त्यावेळी आशुतोष काळे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, नव्या इमारतीचे लोकार्पण करताना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सदनाच्या चाव्या देताना मनस्वी आनंद होत आहे. पूर्वी कोपरगाव शहर व कोपरगाव तालुका असे एकच पोलिस स्टेशन होते. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण पडत होता. यावर कायमचा तोडगा निघावा म्हणून माजी आ. अशोकराव काळे यांनी २०१३ साली तत्कालीन गृहमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मार्फत शहर व ग्रामीण असे दोन वेगवेगळी पोलिस स्टेशन तयार केली.

 

यावेळी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, प्रांताधिकारी माणिक आहेर, तालुका पौलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप कोळी, शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, माजी आ. स्नेहलताताई कोल्हे, राजेश आबा परजणे, राजेंद्र जाधव, नगराध्यक्ष पराग संधान, नितीन औताडे, काकासाहेब कोयटे, काळे कारखाना व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे कोल्हे कारखाना देअरमन ज्ञानेश्वर परजणे, संभाजी काळे, विश्वासराव महाले, अरुण येवले आदीसह पोलीस अधिकारी संख्येने नागरिक उपस्थित होते.

Ajit Pawar Plane Crash: २० आमदारांची ‘देवगिरी’वर सुनेत्रा पवारांशी खलबतं; राष्ट्रवादीत घडामोडींना वेग

पोलिसांनी तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी

तालुका पोलीस स्टेशन इमारत आणि पोलीस कर्मचारी वसाहती व्हावी यासाठी तालुक्यामध्ये अजूनही कायदा सुव्यवस्थेचा आणि अवैध धंद्यांचा प्रश्न शिल्लक आहे. यावर पोलिस प्रशासन आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अधिक ताकतीने काम करावे.

पोलिस प्रशासनाचे पाठबळ इतर विभागाला मिळाले तर त्यांची काम करण्याची उर्जा वाढते. यामुळे पोलिस प्रशासनाने जबादारीने काम करून तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी.

कोपरगाव तालुक्याचे प्रशासकीय कामकाज विना अडथळा चालण्यासाठी कोपरगाव कोर्ट, उप जिल्हा रुग्णालय व पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहत इमारत उभी राहण्यासाठी अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.

 

Web Title: Inauguration of a 64 flat housing complex for police personnel in kopargaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • junnar news
  • Municipal Council
  • Pune Politics

संबंधित बातम्या

जुन्नर नगरपालिकेचा 150 कोटी 13 लाख खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर; सर्वसामान्य जनतेला होणार थेट फायदा
1

जुन्नर नगरपालिकेचा 150 कोटी 13 लाख खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर; सर्वसामान्य जनतेला होणार थेट फायदा

Pune Politics: पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय रचनेवरून राजकारण; राष्ट्रवादीचा प्रशासनावर ‘राजकीय’ हेतूचा आरोप
2

Pune Politics: पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय रचनेवरून राजकारण; राष्ट्रवादीचा प्रशासनावर ‘राजकीय’ हेतूचा आरोप

मला विसरलात का? Leopard इज बॅक; ‘या’ तालुक्यात मेंढपाळांना करावे लागतायेत ‘मृत्यू’शी दोन हात
3

मला विसरलात का? Leopard इज बॅक; ‘या’ तालुक्यात मेंढपाळांना करावे लागतायेत ‘मृत्यू’शी दोन हात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.