Ajit Pawar Plane Crash संदर्भात २० आमदारांची 'देवगिरी'बंगल्यावर सुनेत्रा पवारांशी गुप्त बैठक
Ajit Pawar Plane Crash: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात संशय दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत VSR या विमान कंपनी आणि नागरी उड्डाण संचलनालय (DGCA) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवाार यांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय रोहित पवार सातत्याने व्यक्त करत आहेत. या सगळ्या घडामोडीत बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आमदार अचानक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. या भेटीत आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्याशी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. (Ajit Pawar Plane Crash)
मिळालेल्या माहितीनुसार, देवगिरी बंगल्यावर दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या २० आमदारांनीदेखील अजित पवार यांच्या निमान दुर्घटनेबाबत शंका उपस्थित केली आहे. DGCAने नुकताच अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अहवाल सादर केला. त्यानंतर रोहित पवार यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे आमदारही विमान अपघाताबाबत आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदारांकडूनही शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या भेटीत आमदारांनी शंका उपस्थित केल्या आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CBI मार्फत चौकशी व्हावी, या आशयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. या मागणीचे पुढे काय झाले, याबाबत मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विचारावे, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मागणी केली आहे. त्यावर आपण सर्वजण पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याची भेट घेऊ, असंही या आमदारांकडून सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आमदार रोहित पवार यांच्या पाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांकडूनही विमान अपघाताच्या अहवालात त्रुटी असल्याचे सांगितले जात आहे. या अहवालाबाबत अनेक प्रश्न आणि शंका आमदारांकडून उपस्थित करण्यात आल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी देवगिरी बंगल्यावर आलेल्या प्रत्येक आमदाराशी स्वतंत्र चर्चा केल्याचेही सांगितले जात आहे.
सुनेत्रा पवार यांनी कालच्या आमदारांच्या बैठकीसाठी आलेल्या आमदारांना अजित पवार यांच्या अपघातानंतर मिळालेली चप्पल आणि घड्याळ या वस्तू सगळ्यांना दाखवल्या. त्या अनुषंगानेही सुनेत्रा पवार यांच्याशी आमदारांनी चर्चा केली. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
Kolhapur Heat: महाराष्ट्र होरपळला! कोल्हापुरात पारा ३४.९ अंशांवर, तर विदर्भात ‘हीट वेव्ह’चा इशारा
“दादांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही राहुल गांधींना भेटू. आम्ही त्यांना लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यास सांगू. असंही रोहित पवारांनी सांगितलं. रोहित पवार म्हणाले, “घटनेपूर्वी दादा सुमारे पाच महिने अत्यंत खबरदारी घेत होते. त्यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे बंद केले होते; ते फक्त काचेच्या ग्लासमधून पाणी पित होते. पाणी दूषित करण्याचा प्रयत्न असू शकतो. अजित दादांना आम्ही विचारलं, ते असं का करत आहेत, तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की, त्यांना सावध राहण्याच्या आणि खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. ते सरकारी सुरक्षा रक्षकांसोबतच खाजगी सुरक्षा रक्षकही सोबत ठेवत होते.असा दावा रोहित पवार यांनी केला.






