Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालेगावमधील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण !100 खाटांचे अत्याधुनिक सुविधांचे रुग्णालय

मालेगाव येथील १०० खाटांच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडला. या रुग्णालयात महिला आणि १२ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांवर आधुनिक पध्दतीने उपचार दिले जाणार आहेत . जाणून घ्या रुग्णालयाबाबत

  • By नारायण परब
Updated On: Sep 18, 2024 | 11:31 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

आज  दि. १८ सप्टेंबर रोजी मालेगाव येथील  १०० खाटांच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्ट. जन. डॉ. माधुरी कानिटकर, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, मुख्यमंत्री जनकल्याण विभागाच्या समन्वयक डॉ. ज्योती वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे आदी उपस्थित होते. मालेगाव शहरातील कॅम्प भागात महिला व बालकांसाठी १०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात महिला आणि १२ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांवर आधुनिक पध्दतीने उपचार केले जातील. त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले

रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शिवभोजन व्यवस्था

पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले की,  या रुग्णालयात विविध सुविधा पुरवल्या जातील तसेच  दरमहा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येईल.  महत्वाचे म्हणजे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शिवभोजन व्यवस्था केली गेली आहे.  रुग्णालयाची शिस्त आणि स्वच्छता प्रत्येकानेच पाळली पाहिजे. रुग्णालयात सीसीटिव्ही कार्यान्वित केले गेले आहेत.  तसेच पोलिस चौकी उभारण्यात येईल, असेही

डॉ. कानिटकर म्हणाल्या की, वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची संधी मिळाली. प्रत्येक महिलेने या रुग्णालयाचा लाभ घ्यावा. विकसित भारत घडविण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. प्रसुतीसाठी महिलांनी रुग्णालयातच दाखल व्हावे. बालकांना प्रत्येक डोस देत लसीकरण करून घ्यावे. त्याची मोफत सुविधा आहे. त्याबरोबरच महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी.

डॉ. शिंदे म्हणाले की, मालेगाव येथे महिला व बाल रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यासाठी पालकमंत्री श्री. भुसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन केले. अतिशय सुसज्ज असे रुग्णालय साकारले आहे.

डॉ. वाघमारे म्हणाल्या की, अतिशय अत्याधुनिक असे रुग्णालय आहे. त्याचा सर्व सामान्य कुटुंबातील महिलांना लाभ होणार आहे.

यावेळी या लोकार्पण सोहळ्यास  महिला, नागरिक, आरोग्य यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

नव्या महिला व बाल रुग्णालयामधील विविध विभाग

  • आपत्कालिन वैद्यकीय सेवा 24/7
  • मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर
  • मॉड्यूलर लेबर रुम
  • क्ष – किरण व सोनोग्राफी सुविधा
  • प्रयोगशाळा तपासण्या , रक्त साठवणूक केंद्र
  • रुग्ण्वाहिका / मोफत संदर्भ व वाहतूक
  • मोफत औषध उपचार व पुरवठा
  • प्रसुतीपूर्व व पश्चात तपासणी
  • सिझेरीयन प्रसुती
  • नियमित लसीकरण
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया , इतर स्त्री रोग
  • नवजात व लहान मुलांची तपासणी व उपचार
  • हिरकणी कक्ष

Web Title: Inauguration of krantijyoti savitribai phule women and children hospital in malegaon 100 bedded hospital with state of the art facilities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 11:31 PM

Topics:  

  • maharashtra
  • Malegaon
  • Nashik

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
3

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
4

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.