Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

बाह्य रिंग रोड प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून सुपीक जमिनी वाचवण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 18, 2026 | 11:57 AM
गिरीष महाजन हटाव', सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

गिरीष महाजन हटाव', सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • बाह्य रिंग रोडविरोधात शेतकरी आक्रमक
  • जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
  • सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार
  • ‘मंत्री महाजन हटाव’ची मागणी
नाशिक : बाह्य रिंग रोडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर डल्ला मारण्याचा डाव उधळून लावण्याचा निर्धार करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. रविवार (दि. १७) रोजी विल्होळीत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत मंत्री महाजन हटावच्या मागणीसह जमिनी अधिग्रहित करण्यासाठीच मंत्री महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती केली, असा गंभीर आरोप यावेळी शेतकऱ्यांनी बैठकीत केला आहे. दरम्यान बैठकीत रिंग रोडविरोधात सोमवार (दि. १८) रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुंभमेळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता ६६.५ किलोमिटरचे रिंग रोड तयार केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भुसंपादन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र या रिंगरोडमुळे सुपीक जमिनी, घरे, व्यवसायीक दुकाने बाधित होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रिंगरोडला तीव्र विरोध होत आहे. मोजणीस गेलेल्या अधिकाऱ्यांनी महिला व शेतकऱ्यांना मारहाण केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहे. या मारहाणी घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

Farmer Protest : ‘जखमेवर मीठ’ की मदतीचा हात? कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा

शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मातोरी व मुंगसरा या दोन गावांना प्रत्यक भेट देऊन रिंग रोडमुळे बाधीत होणाऱ्या क्षेत्राची पाहणी केली होती. या वेळी शेतकऱ्यांनी प्रस्तावित रिंगरोडचा मार्ग बदलण्याची मागणी करून प्रशासनाला दुसरे चार पर्यायी मार्ग सुचविले.

शेतकऱ्यांनी सुचविलेले हे पर्यायी मार्ग तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रविवारी (दि. १७) जमीन अधिग्रहणाच्या विरोधात एकत्र येत विल्होळी येथील के. केशवराव थोरात ग्रामसंस्कार सभागृहात बैठक घेतली. यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, साहेबराव दातीर, अॅड. कैलास खांडबळे, कामगार नेते विक्रम नागरे यांच्यासह मातोरी, मुंगसरा, आंबे, राजूर बहुला, पारदेवीसह २० गावांतील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुंभमेळा मंत्रीपद घटनाबाह्य

कुंभमेळा मंत्री हे घटनाबाहा पद वापरून प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचे शेतकऱ्यांनी बैठकीत सांगितले, मंत्री महाजनांचा हस्तक्षेप थांबला नाही तर त्यांच्या पदालाच न्यायालयात खेचू असा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. कुंभमेळ्याचे कारण देत जमिनी अधिग्रहित करण्यासाठीच महाजन यांनी जिल्हाधिकारी प्रसाद यांची विशेष नियुक्ती केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला.

मुंगसऱ्यात ‘आत्मक्लेश’

सोमवार (दि. १८) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलनानंतर मुंगसरात मोजणीदरम्यान अधिकारी पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या ८० वर्षीय आजीच्या दारात तीन तासांचे ‘आत्मक्लेश आंदोलन’ करण्यात येणार आहे. त्यानतर पुढील जनआंदोलनाची रणनीती जाहीर केली जाणार आहे.

Nagpur Airport: मोठी बातमी! नागपूर विमानतळाला मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जा; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

Web Title: Farmers protest against outer ring road land acquisition news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • Farmers Protest
  • maharashtra
  • Ring Road

संबंधित बातम्या

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
1

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
2

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन
3

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा आणखी एक बळी! 34 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात
4

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा आणखी एक बळी! 34 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.