Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील शिक्षिका मनीषा मांढरेला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 18, 2026 | 06:38 PM
नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Follow Us
Follow Us:

पुणे : नीट २०२६ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात अटक झालेल्या पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील शिक्षिका मनीषा मांढरेला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम ३३ (५) अन्वये ही कारवाई करण्यात आली असून, त्यांना अटक झालेल्या १६ मेपासून निलंबन लागू करण्यात आले आहे.

 

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख आणि सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संस्थेच्या नियामक मंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत मांढरे यांच्या संदर्भातील घडामोडींची गांभीर्याने दखल घेत निलंबनाचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मनीषा मांढरे या सन २००२ पासून मॉडर्न महाविद्यालयात कार्यरत असून, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषयाचे अध्यापन करत आहेत. अध्यापनातील अनुभवाच्या आधारे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नीट परीक्षेसंदर्भातील काही गोपनीय कामकाजासाठी त्यांची नियुक्ती केली होती. मात्र, या नियुक्तीशी संस्था किंवा महाविद्यालयाचा कोणताही संबंध नसल्याचा दावा प्रसिद्धिपत्रकात करण्यात आला आहे. संबंधित कामकाज पूर्णपणे गोपनीय स्वरूपाचे होते. त्यासंदर्भातील सर्व पत्रव्यवहार, सूचना आणि प्रक्रिया या थेट एनटीए आणि मनीषा मांढरे यांच्यामध्येच होत होत्या. त्यामुळे या प्रक्रियेशी महाविद्यालय प्रशासन अथवा संस्थेचा दूरान्वये संबंध नसल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : CBSE चा ऐतिहासिक निर्णय! आता फक्त १०० रुपयांत पाहा तुमची उत्तरपत्रिका; पेपर पुनर्तपासणीची फी देखील केली कमी..

मनीषा मांढरे यांना नीट २०२६ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात अटक झाल्याची माहिती वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांद्वारे समोर आली. ही घटना गंभीर, दुर्दैवी आणि निंदनीय असून, शिक्षण क्षेत्राच्या प्रतिमेला बाधा पोहोचवणारी असल्याचेही संस्थेने म्हटले आहे. मांढरेच्या निलंबनाबाबत शिक्षण आयुक्त, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसंचालक यांना कळविण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) सहकार्याने करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, अखेर शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक

Web Title: Modern college in pune has suspended manisha mandhre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • maharashtra
  • NEET Exam
  • pune news
  • Teachers

संबंधित बातम्या

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना
1

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
2

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
3

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
4

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.