Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ; अवघ्या तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

2025 च्या पहिल्या सहामाहीत (1 जानेवारी ते 26 जून) तब्बल 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. ही संख्या 2024 मधील याच कालावधीतील 430 आत्महत्यांपेक्षा 20 टक्क्यांनी जास्त आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2025 | 09:05 AM
धक्कादायक ! दररोज 28 शेतकरी करत आहेत आत्महत्या; सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात, NCRB चा रिपोर्ट समोर

धक्कादायक ! दररोज 28 शेतकरी करत आहेत आत्महत्या; सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात, NCRB चा रिपोर्ट समोर

Follow Us
Follow Us:

संभाजीनगर : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून, विशेषतः मराठवाड्यात ही परिस्थिती आणखी भयाण आहे. राज्यात तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. तसेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राज्य महसूल विभागाच्या अहवालानुसार, 2025 च्या पहिल्या सहामाहीत (1 जानेवारी ते 26 जून) तब्बल 520 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. ही संख्या 2024 मधील याच कालावधीतील 430 आत्महत्यांपेक्षा 20 टक्क्यांनी जास्त आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी पीकविम्याची प्रतिक्षा, कधी बाजारभावाची अनिश्चितता अशा हे संकटांच्या साखळीत अडकलेले शेतकरी शेवटी आयुष्यच संपवतात.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी बीड जिल्हा सर्वाधिक आत्महत्या नोंदवलेल्या जिल्ह्यांच्या यादीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे. जानेवारी ते जून २०२५ दरम्यान बीडमध्ये तब्बल १२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या १०१ होती.

373 कुटुंबांना मदत, 200 कुटुंब अपात्र

पीक नुकसान, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांकडून किंवा परवानाधारक सावकारांकडून कर्ज फेडण्यास असमर्थता, वाढत्या कर्जामुळे झालेल्या शेतकरी आत्महत्या आर्थिक मदतीसाठी पात्र मानल्या जातात. अशा शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये दिले जातात. राज्यभरात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ३७३ कुटुंबे आर्थिक भरपाईसाठी पात्र असल्याचे आढळून आले. तर २०० कुटुंबांना अपात्र घोषित करण्यात आले, असे मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत शेतकरी आत्महत्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्रासाठी बिकट प्रश्न

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्रासाठी एक बिकट प्रश्न बनत आहे. आपल्या राज्याला पुरोगामी राज्य म्हटले जाते. जेव्हा शेतकरी प्रत्येक बाबतीत हताश आणि असहाय्य होतो, तेव्हाच तो असे धोकादायक पाऊल उचलतो. जानेवारी 2015  ते मार्च 2019  पर्यंत महाराष्ट्रात 12,616 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2023 पर्यंत, राज्यात दररोज सरासरी 7 शेतकरी आत्महत्या करतात. गेल्या आठवड्यात, विदर्भातील कैलाश अर्जुन नागरे नावाच्या तरुण आणि होतकरु शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत.

Web Title: Increase in farmer suicides in marathwada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • Marathwada
  • Suicide case

संबंधित बातम्या

आणखी एक हुंडाबळी! सासरच्या घरात मृतावस्थेत आढळळी सोशल मिडिया इन्फ्लुएंसर, दिड वर्षांआधी झालं होतं लग्न…
1

आणखी एक हुंडाबळी! सासरच्या घरात मृतावस्थेत आढळळी सोशल मिडिया इन्फ्लुएंसर, दिड वर्षांआधी झालं होतं लग्न…

‘सॉरी मम्मी-पप्पा, पुन्हा परीक्षेची हिंमत नाही’; आणखी एका NEET विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
2

‘सॉरी मम्मी-पप्पा, पुन्हा परीक्षेची हिंमत नाही’; आणखी एका NEET विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

मोसंबीला ‘मिठाईचा दर्जा’ द्या! दर मिळत नसल्याने आर्थिककोंडी; मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी
3

मोसंबीला ‘मिठाईचा दर्जा’ द्या! दर मिळत नसल्याने आर्थिककोंडी; मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.