Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगली जिल्ह्यात ऊस क्षेत्रात वाढ; कारखाना बंदचा परिणाम नाहीच

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 06, 2022 | 01:56 PM
सांगली जिल्ह्यात ऊस क्षेत्रात वाढ; कारखाना बंदचा परिणाम नाहीच
Follow Us
Close
Follow Us:

सांगली : जिल्ह्यात दुष्काळी पट्ट्यात सिंचन योजनेचे पाणी आणि अतिवृष्टी यामुळे शाश्वत पाण्याची उपलब्धता झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्यासह दुष्काळी पट्ट्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सन २०२२- २३ साठी १ लाख २४ हजार २६९ हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २ हजार २९२ हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, चालु हंगामात कवठेमहांकाळ येथील साखर कारखाना बंद असला तरी या भागात गतवर्षीच्या तुलनेत २ हजार १४५ हेक्टरने क्षेत्र वाढले आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून उसाच्या क्षेत्र वाढ असल्याचे दिसते आहे. मुळात कृष्णा आणि वारणा नदीकाठी क्षेत्रात वाढ अथवा घटले जाते. परंतू गेल्या चार वर्षापासून जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका ऊस पिकाला बसला असला तरी, शेतकरी ऊस लागवडीसाठी पुढे येत असून त्यामुळे शेतकरी मे महिन्यापासूनच ऊस लागवड करत आहेत. जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याने प्रत्येक भागातील कारखाने त्यानुसार ऊस तोडणीचे नियोजन करत आहेत. गतवर्षी १ लाख २१ हजार ९७७ हेक्टरवरील ऊस गाळपास उपलब्ध होते. पुढील वर्षीच्या गाळप हंगामासाठी उसाच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट होईल, असा अंदाज कारखानदारांनी व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज फोल ठरला आहे. जिल्ह्यात दोन हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे.

परंतू शिराळा, खानापूर आणि जत या तीन तालुक्यातील उसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. खानापूर, तासगाव तालुक्यात सध्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार उस क्षेत्र कमी आहे. मात्र, त्याठिकाणचे शेतकरी कारखान्यांना ऊस नोंदणीसाठी पुढे आले नसल्याचे कारखान्यांनी सांगितले आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी कारखान्यांना उसाची नोंदणी केली तर उसाच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज आहे.

कारखाना बंदचा लागवडीवर परिणाम नाहीच

कवठेमहांकाळ तालुक्यात महांकाली साखर कारखाना आहे. या तालुक्यात कारखाना झाल्याने इथला शेतकरी ऊस लागवडीकडे वळाला. गतवर्षी तालुक्यात ३ हजार ०७० हेक्टर इतका ऊस गाळपास होता. मात्र, यंदाच्या गाळपात हा कारखाना सुरु झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी मोठी कसरत करावी लागली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी ऊस पिक सोडून इतर पिकाकडे वळतील अशी शक्यता होती. परंतू, कारखाना बंद असल्याचा परिणाम तालुक्यात कुठे दिसत नाही. सन २०२२-२३ साठी तालुक्यात ५११२ हेक्टरवर लागवड झाली आहे. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत २ हजार १४२ हेक्टरने वाढ झाली आहे.

तालुकानिहाय सन २०२२-२३ मध्ये गाळपास उपलब्ध होणारा ऊस (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका….आडसाली…..पूर्व हंगामी…. सुरु…..खोडवा….एकूण
मिरज….५८९७…४०७५…२४०३…६४०३…१८७७९
वाळवा….१६९०५…५२७१…२९४५…१०५८३…३५७०४
शिराळा...१२३३….२१७९…२१०४…३४२९…८९४५
जत…१०७…८९०…१०७६…९३१…३००४
कवठेमहांकाळ…३२५…८७०…१७५९…२२६१…५२१५
तासगाव..२२६५…१००९…१५३४…२५३८…७३४६
पलूस….४१९०…३९३१…३००…५६६४…१४०८५
खानापूर…३१०२…१८५२…१९९९…२९५२…९९०५
आटपाडी….२७५…२८२…४३८…७१५…१७१०
कडेगाव….५०९१…५२८१…३१३५….६०६९…१९५७६
एकूण…३९३९०…२५६४०…१७६९४…४१५४५…१२४२६९

चालु वर्षात गाळप झालेले उसाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

आडसाली : ३९ हजार ३१४
पूर्व हंगामी : २० हजार ८७०
सुरु : १५ हजार ५२७
खोडवा : ४६ हजार २६५
एकूण : १ लाख २१ हजार ९७७

Web Title: Increase in sugarcane area in sangli district the factory shutdown is not the result nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2022 | 01:56 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
2

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
3

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
4

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.