
महापालिका निवडणुका संपताच पवारांना मोठा धक्का
अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये दोन्ही पवार एकत्रित लढणार
इंदापूर: काल राज्यातील 29 महानगरपालिकांचा महानिकाल लागला. जवळपास 29 पैकी 25 महापालिकेवर महायुतीचा विजय झालेला आहे. दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड जिंकण्यासाठी अजित पवारांनी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता निवडणुका संपताच पवारांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.
महानगरपालिका निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडणार आहे. तयासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्रित लढणार असे समोर येत आहे. त्याआधीच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. इंदापूरमध्ये अजित पवारांच्या अनेक कार्यकर्त्यांना पक्षाला निरोप दिला आहे.
PCMC Election Results: महेश लांडगे ‘दादां’वर ठरले वरचढ; पिंपरी-चिंचवडमध्ये मिळवली एकहाती सत्ता
इंदापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठे भगदाड पडले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. रवींद्र चव्हाण यांनी याबबात सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.
तुमची आमची भाजपा सर्वांची
इंदापूर तालुक्यातील (जि.पुणे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपा परिवारात प्रवेश! पक्ष प्रवेश करणारे मान्यवर- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलआप्पा ननवरे, माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, विद्यमान नगरसेवक काकाशेठ शेटे- पाटील, गणेश राऊत, सुधाकर ढगे, संजय शिंदे, वसीमभाई बागवान, हाजी नवाब बागवान, अनिल पवार.
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷 इंदापूर तालुक्यातील (जि.पुणे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपा परिवारात प्रवेश! 📍पक्ष प्रवेश करणारे मान्यवर-
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलआप्पा… pic.twitter.com/CG483X58hh — Ravindra Chavan (@RaviDadaChavan) January 17, 2026
माजी नगरसेवक अविनाश मखरे, माजी नगरसेवक व माजी जिल्हाध्यक्ष अनिल राऊत, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, लाखेवाडी गावचे माजी सरपंच प्रभाकर खाडे, निमगाव केतकी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य माजी वैभव जाधव, नरसिंपूर गावचे माजी सरपंच श्रीकांत दंडवते, ओबीसी सेलचे युवक अध्यक्ष महेश जठार, सामाजिक कार्यकर्ते उमेश क्षिरसागर, सामाजिक कार्यकर्ते समीर देशमुख, रासपचे इंदापूर शहराध्यक्ष हुसेन मुलाणी, सामाजिक कार्यकर्ते गोरख पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते.
Maharashtra Politics: महायुती तुटणार? राजकारणात मोठा भूकंप! दोन्ही पवार एकत्र; भाजपचे काय?
दोन्ही पवार एकत्र; भाजपचे काय?
शशिकांत शिंदे म्हणाले, महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले, त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. राज्यातील १२ ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र लढणार आहेत. काही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही स्वतंत्र मैत्रीपूर्ण लढणार आहोत. ग्रामीण भागात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे, या पार्श्वभूमीवर मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहोत.