Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश

Veer Dam Water Release : शेटफळ तलाव लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन परिस्थितीची कल्पना दिली

  • By anuradha sagar
Updated On: Sep 30, 2026 | 05:17 PM
Indapur, Veer Dam, Shetphal Lake, Harshvardhan Patil

Indapur, Veer Dam, Shetphal Lake, Harshvardhan Patil

Follow Us
Follow Us:
  • इंदापूर तालुक्यातील शेटफळ तलाव लाभक्षेत्रातील १० गावांना वीर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय
  • गेल्या ५ महिन्यांपासून पाण्याचे आवर्तन न सुटल्याने परिसरात निर्माण झाली होती विदारक स्थिती
  • माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश
Veer Dam Water Release : इंदापूर तालुक्यातील शेटफळ तलाव लाभक्षेत्रातील दहा गावांमध्ये गेली पाच महिन्यांपासून आवर्तन सोडले नसल्याने विदारक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वीर धरणातून शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचे लेखी आदेश जलसंपदा मंत्री ( कृष्णा खोरे ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंत संजीव चोपडे यांना दिले आहेत. त्यानुसार वीर धरणातून शेटफळ तलावासाठी मंगळवारी मंगळवारी (दि.२९) पाणी सोडण्यात आले आहे. पाणी बुधवारी शेटफळ तलावामध्ये पोहचणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

शेटफळ तलाव लाभ क्षेत्रामध्ये दुष्काळामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने तलावामध्ये पाणी सोडणे संदर्भात मंत्रालयामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदामध्ये विखे पाटील यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी लाभक्षेत्रातील दहा ग्रामपंचायतींचे जनावरांना हिरव्या चाऱ्यासाठी व पिण्याचे पाण्यासाठी पाणी सोडणे या संदर्भातील ठराव व निवेदन हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. त्यानुसार जलसंपदा मंत्र्यांनी जलसंपदा विभागाला पाणी सोडण्याचे लेखी आदेश दिले.

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

प्रसंगी पोलिस बंदोबस्ताच्या सूचना

पुणे जिल्ह्यातील सर्व जलसंपदाचे अधिकारी हे निरा डावा कालव्यावर पाठवून पाणी हे शेटफळ तलावामध्ये पोहोचविण्याचे नियोजन करण्याचे आदेशही यावेळी मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागास दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना पाणी तलावामध्ये पोहोचणे संदर्भात प्रसंगी पोलीस बंदोबस्त देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

शेटफळ तलावामध्ये पाणी येणार असल्याने क्षेत्रातील दहा गावांमधील जनावरांच्या चाऱ्याचा माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी सकारात्मक

शेटफळ तलावामध्ये पाणी सोडणे संदर्भात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचेशी चर्चा झाली. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र गुड्डी, पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे,अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे व कार्यकारी अभियंता दिंगबर डुबल आदी जलसंपदाच्या आधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचेही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी नमूद केले.

Mamata Banerjee on Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार चोर, त्यांनी मते चोरली अन् EVM जाळली!; ममता बॅनर्जींचा ज्ञानेश कुमारांवर थेट हल्ला

ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

वीर धरणाचा व्हॉल्व हा सोमवारी रात्री निरा डावा कालव्याचे आवर्तन संपल्याने बंद करण्यात आलेला होता. मात्र शेटफळ धरणामध्ये पाणी सोडण्याचे जलसंपदा मंत्र्याचा आदेश आल्याने व्हॉल्व हा मंगळवारी दुपारी उघडण्यात येऊन पाणी थेट शेटफळ तलावात पोहचणार असल्याने लाभक्षेत्रामधील दहा गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Indapur shetphal lake water released from veer dam harshvardhan patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Harshvardhan Patil
  • pune news
  • Radhakrishna Vikhe Patil
  • Water Crisis

संबंधित बातम्या

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
1

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
2

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
3

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Pune IMD El Nino Warning : राज्यात पावसाची दांडी, खरिपाची पिके करपली!
4

Pune IMD El Nino Warning : राज्यात पावसाची दांडी, खरिपाची पिके करपली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.