India vs Pakistan cricket live macth asia cup 2025 shivsena leader TV broke
INDvsPAK : मुंबई : आशिया कप 2025 सुरु असून आजची मॅच ही वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली आहे. आज दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. मात्र यावरुन जोरदार राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. भारतामध्ये पहलगाम हल्ला झाल्यामुळे ही मॅच रद्द करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. दुबईमध्ये होणाऱ्या या मॅचमुळे मुंबईमध्ये जोरदार वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून संपूर्ण राज्यामधून तीव्र विरोध केला जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून आठड्याभरपासून भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याला तीव्र विरोध दर्शवला जात आहे. आशिया कपमध्ये दुबईमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात माझा कुंकू माझा देश असे आंदोलन शिवसेनेच्या महिला नेत्यांकडून केले जात आहे. यानंतर आता मुंबईत शिवसेना (उबाठा) नेते आनंद दुबे यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. आनंद दुबे यांनी भारत पाकिस्तान मॅचपूर्वी टीव्ही फोडून निषेध केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबईतील शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्याच्या विरोधात निषेध केला. अनेक टीव्ही तोडण्यात आले, त्यांनी दावा केला की ते भारत-पाकिस्तान सामना पाहणार नाहीत. पुढे ते म्हणाले की, भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळू नये. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, या हल्ल्यात आपल्या माता आणि बहिणींनी आपले वैवाहिक जीवन गमावले. ते हा सामना टीव्हीवर पाहू शकतात का? देशाच्या भावनांशी खेळले जात आहे, हे सहन केले जाऊ शकत नाही, असा आक्रमक पवित्रा आनंद दुबे यांनी घेतला आहे.
आम्ही क्रिकेटचा खूप आदर करतो, पण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू शकत नाही. रक्त आणि खेळ एकत्र येऊ शकत नाहीत. भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार आहे. दुबईमध्ये भारत-पाकिस्तान सामना आयोजित करण्यास आमचा विरोध आहे. या सामन्याची गरज नाही. आम्ही भारत सरकारला त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि बीसीसीआयला त्यानुसार सूचना देण्याची विनंती आम्ही करत आहोत. जर मॅचच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील आणि बीसीसीआयला पैशांची गरज असेल तर आम्ही सर्वजण त्यांना देणग्या आणि वर्गणी पाठवू शकतो. १४० कोटी देशवासीयांच्या भावनांशी खेळणे आपण कसे सहन करू शकतो? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी महिला नेते रस्त्यावर क्रिकेट खेळत सरकार विरोधी घोषणाबाजी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारत आणि पाकिस्तान सामना होऊ नये यासाठी मनसेने देखील शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे. मनसेकडून नाशिकमध्ये या सामन्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील टीव्ही फोडत निषेध दर्शवला आहे. हा सामना टीव्हीवर पाहणार नाही असा आक्रमक पवित्रा मनसेकडून देखील घेण्यात आला आहे.