एआयएमआयचे खासदार असदुद्दीन ओवैसी आशिया कॅप 2025 यांचा भारत पाक सामन्याला विरोध दर्शवला आहे (फोेटो - सोशल मीडिया)
India vs Pakistan Live : नवी दिल्ली : आशिया कप मॅच सध्या सुरु असून आज (दि.14) मोठी मॅच होणार आहे. आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. यावरुन भारतामध्ये तीव्र विरोध दर्शवला जात आहे. भारतामध्ये भारत-पाक सामन्यावरुन सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर होणाऱ्या या मॅचवर जोरदार विरोध केला जात आहे. तसेच हा सामना रद्द करण्यात यावा अशी देखील मागणी केली जात आहे. याबाबत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांची भूमिका मांडली असून या सामन्याला तीव्र विरोध दर्शवला आहे.
एआयएमआयचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केली आहे. यामधून त्यांनी भारत-पाक सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. असदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पाकिस्तानसोबत मॅच खेळत आहात? पहलगाम हल्ल्यामध्ये हीच घटना तुमच्या मुलीसोबत झाली असती तर सामना खेळला असता का अशा सवाल देखील असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारत पाकिस्तान सामन्याविरोधात भूमिका मांडताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “भारत पाक क्रिकेटचा सामना होईल, त्यात किती पैसे येतील? ६००-७०० कोटी. आता हे भाजपाच्या लोकांना सांगायचे आहे की, देशभक्तीवर बोलणा यांनो ओजळभर पाण्यात बुडून मरा आम्ही भारताच्या पंतप्रधानांना विचारू इच्छितो की, तुम्ही म्हणालात की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, चर्चा आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाही. एका क्रिकेट सामन्याने बीसीसीआयला किती पैसे मिळतील? २००० कोटी? ३००० कोटी? आपल्या २६ भारतीय नागरिकांच्या प्राणांची मूल्य अधिक आहे की पैसे जास्त आहेत ते सांगा… हे भाजपाला सांगावेच लागेल देशभक्तीवर मोठ-मोठी भाषण देतात, ज्ञान देतात क्रिकेट मॅचचा प्रश्न आला तर रन जाऊट झालात,” अशा घणाघाती टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना ठाकरे गटाकडून देखील या सामन्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. पक्षाकडून संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. माझे कुंकू माझा देश असे आंदोलन शिवसेना ठाकरे गटाकडून केले जात आहे. तसेच कुंकू देखील सरकारला पाठवले जात आहे. यामुळे संपूर्ण देशभरातून भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याला विरोध दर्शवला जात आहे.
India-Pakistan Match: हमारे 26 भारतीयों की जान की कीमत पैसों से बढ़कर नहीं है pic.twitter.com/NvsmkrOGes
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) September 14, 2025