Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑपरेशन सिंदूरने देशाच्या अपेक्षा पूर्ण केल्या…; ठाकरे गटाचे जिल्हा संघटक सुधीर राऊत यांची प्रतिक्रिया

पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने ऑपरेशन सिंदूर केले. यामध्ये एकही पाकिस्तानी नागरिकाला न मारता दहशतवादी हल्ला करण्यात आला. यानंतर साताऱ्यामध्ये एकच जल्लोष दिसून आला.

  • By प्रीति माने
Updated On: May 08, 2025 | 04:53 PM
Indian Army celebrates after Operation Sindoor by holding bike rally in Satara

Indian Army celebrates after Operation Sindoor by holding bike rally in Satara

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करून ते पूर्णपणे नेस्तनाबूत केले आहेत. या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ९ दहशतवादी ठिकाणांवर भारतीय लष्कराने हल्ले केले आहेत. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराला कोणत्याही प्रकारे लक्ष्य करण्यात आलेले नाही. तसेच पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांना देखील लक्ष्य करण्यात आले नाही. एकही पाकिस्तानी नागरिक यामध्ये जखमी नाही. ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता, अशी कारवाई भारतीय लष्कराने केली. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक सुधीर राऊत यांनी ‘भारतमाता की जय’ असे म्हणत आनंद व्यक्त केला.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पंधरा दिवसांपूर्वी काश्मीरच्या स्वर्गीय सुखाचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक पहलगाम येथे गेले होते. या निशस्त्र पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. तुमचा धर्म कोणता, असे विचारून हिंदू मुसलमान नागरिकांना वेगळे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या दरम्यान त्यांनी काही जणांना कुराणातील ‘आयत’ म्हणायली लावली. ज्यांना म्हणता आली नाही, त्यांना त्याक्षणी गोळ्या मारण्यात आल्या. या हल्ल्यात जवळपास २७ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पहलगाममधील दहशतवाद्यांनी बैसरन पहलगाममध्ये हल्ला केला तेव्हा त्यांनी कोणत्याही महिलेची हत्या केली नाही. खरे तर, दहशतवाद्यांना केवळ पुरुषांना लक्ष्य करून त्यांनाच मारण्याचा प्लॅन होता. म्हणूनच भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. आपल्या आई बहि‍णींचे कुंकू पुसणाऱ्यांना भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे चांगलाच धडा शिकवला असून त्याचा आनंद होत असल्याचे राऊत यांनी पत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार 

भारताच्या या ऑपरेशन सिंदूरनंतर राजधानी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. यामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वपूर्ण आणि सूचक वक्तव्य केली आहेत. सर्वपक्षीय बैठकीमध्ये राजनाथ सिंह म्हणाले की, सिंदूर ऑपरेशन या एअर स्ट्राईकमध्ये जवळपास 100 अतिरेकी मारले गेले आहेत. भारताला परिस्थिती आणखी चिघळायची नाही. पण जर पाकिस्तानने काही आगळीक केल्यास भारत शांत बसणार नाही. ऑपरेशन सिंदूर हे अजून संपलेले नाही.  मीडिया रिपोर्टनुसार, सदर मोहीम संवेदनशील असल्यामुळे याव्यतिरिक्त केंद्र सरकारकडून जादा माहिती दिलेली नाही. तसेच ऑपरेशन सिंदूर हे अजून सुरु असल्यामुळे मृतांचा आकडा समोर आलेला नाही. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतर काही मंत्री उपस्थित होते. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खर्गेनीही बैठकीला हजेरी लावली होती. मात्र सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनुपस्थित होते.

Web Title: Indian army celebrates after operation sindoor by holding bike rally in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pahalgam Terrorist Attack
  • Satara News

संबंधित बातम्या

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?
1

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले
2

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले

महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती
3

महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती

Satara News :  महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?
4

Satara News : महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.