Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती

सातारा जिल्ह्यात महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजपा वगळून समविचारी पक्षांशी युती करून निश्चित चांगली लढत देऊ, असा आत्मविश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 14, 2025 | 06:42 PM
महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती

महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती

Follow Us
Close
Follow Us:
  • आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी
  • स्थानिकच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा प्लॅन
  • शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती

सातारा : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. अशातच आता साताऱ्यातही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरु आहे. सातारा येथील राष्ट्रवादी भवनामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी शशिकांत शिंदे यांनी स्वतः उमेदवारांशी चर्चा करून बऱ्याचशा निवडी अंतिम केल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाला गळती लागली म्हणजे संपले असे नाही. रिकाम्या जागा भरून काढण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणे हे जितके महत्त्वाचे तितकेच निवडणुकीत भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीने त्या संदर्भात भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजपा वगळून समविचारी पक्षांशी युती करून निश्चित चांगली लढत देऊ, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

आमदार शिंदे म्हणाले, साताऱ्यातील सुसंस्कृत वर्ग, तरुण-तरुणी यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला चांगला प्रतिसाद आहे. इतर मागास प्रवर्गाचे प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीला नाकारून राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या समविचारी पक्षांना साथ देत आहेत. त्याचे प्रतिबिंब साताऱ्यात दिसत आहे. ओबीसीच्या संदर्भाने राज्य शासनाने बरेच उलट सुलट निर्णय घेऊन संभ्रमावस्था निर्माण केली आहे. त्यामुळे या प्रवर्गामध्ये असंतोष आहे. सातारा शहरातही महाविकास आघाडी जास्तीत जास्त उमेदवार उभे करून पूर्ण ताकतीने निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.

महाविकास आघाडी सातारा जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे पुन्हा आपले अस्तित्व निर्माण करेल. भारतीय जनता पार्टी साेडून कोणत्याही समविचारी पक्षांशी आमची युती असणार आहे. स्थानिक समीकरणांना महत्त्व देऊन आणि जनमताचा कानोसा घेऊन जनमान्यतेने उमेदवार दिले जात आहेत. – आमदार शशिकांत शिंदे

नगराध्यक्षपदासाठी दिग्गज आमच्या संपर्कात

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीची जर सत्ता साताऱ्यात आली तर घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही जरूर केली जाईल. नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक व दिग्गज आमच्या संपर्कात आहेत, मात्र सर्व काही आत्ताच सांगता येणार नाही आपण काही काळ प्रतीक्षा करावी. परिणाम आपल्यासमोर दिसतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mla shashikant shinde has responded to the local elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 06:42 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Satara News
  • Sharad Pawar
  • Shashikant Shinde

संबंधित बातम्या

कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; पीक सडल्याने भांडवली खर्चही निघेना
1

कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; पीक सडल्याने भांडवली खर्चही निघेना

शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक नगराध्यक्षपदाचे उमेदवार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
2

शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक नगराध्यक्षपदाचे उमेदवार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Navarashtra Special ! ‘…म्हणूनच गुंडांना माज येतो’; कोथरुडमधील वाढत्या गुन्हेगारीवरुन राष्ट्रवादीचे गुरनानी संतापले
3

Navarashtra Special ! ‘…म्हणूनच गुंडांना माज येतो’; कोथरुडमधील वाढत्या गुन्हेगारीवरुन राष्ट्रवादीचे गुरनानी संतापले

Satara News :  महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?
4

Satara News : महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.