
फोटो सौजन्य सोशल मिडिया
रेल्वेने दररोज २४ लाखांपेक्षा जास्त लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वे सर्वांत सुरक्षित प्रवास देणारी रेल्वे ओळखली जाते. रेल्वे स्थानकांवरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही लाखोच्या घरात आहे. मुंबई उपनगरीय नेटवर्कपासून ते दिल्ली-हावडासारख्या प्रमुख मार्गांपर्यंत, हे जाळे दररोज हजारो टन मालवाहतूक करते.
सर्वाधिक प्रवासी वाहतूक असलेल्या 100 स्थानकांची यादी भारतीय रेल्वेने प्रसिद्ध केली आहे. यात ठाणे रेल्वे स्थानक 9.3 कोटी प्रवाशांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. त्या खालोखाल 8.3 कोटी प्रवाशांसह कल्याण स्टेशने दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. तर हावडा स्टेशन 6.1 कोटी प्रवाशांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT व सियालदाह स्टेशनवर प्रत्येकी 5.1 कोटी प्रवाशांनी प्रवास केला असून पनवेल स्थानक सहाव्या क्रमांकार आहे. तर 4.5 कोटी प्रवाशांनी संख्या आहे.पुढे नवी दिल्ली3.9 कोटी प्रवासी संख्या असून दिल्ली स्थानकांने सातवा क्रमांक गाठला आहे.
आठव्या स्थानावर मुंबईकरांच हक्काचं ठिकाणं असलेलं दादर हे नवव्या स्थानकावर आहे. त्याची प्रवासी संख्या 3.2 कोटी आहे. नवव्या आणि दहाव्या स्थानावर आणि एम.जी.आर. चेन्नई सेंट्रल यांचा क्रमांक आहे त्यांची प्रवासी संख्या 3.5 कोटी एवढी आहे.
दरम्यान, अनेक सर्वाधिक व्यस्त स्थानके मुंबईत आणि तिच्या आसपासच्या परिसरात आहेत. ठाणे, कल्याण, मुंबई सीएसएमटी, पनवेल आणि दादर या सर्वांचा पहिल्या 10 मध्ये यांचा समावेश करण्यात आला असून जे मुंबईहून होणाऱ्या मोठ्या संख्येने लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाचे द्योतक आहे.
सुमारे 2.2 कोटी प्रवाशांसह मुंबई सेंट्रल 16 व्या क्रमांकावर आहे. तिरुपती (1.37 कोटी), कानपूर सेंट्रल (1.33 कोटी), विशाखापट्टणम (1.33 कोटी), गोरखपूर (1.30 कोटी), तिरुवनंतपुरम सेंट्रल (1.27 कोटी) भुवनेश्वर (1.22 कोटी), आनंद विहार टर्मिनल (1.22 कोटी), भोपाळ (1.20 कोटी), वाराणसी (1.15 कोटी), कोझिकोड (1.14 कोटी), मथुरा जंक्शन (1.03 कोटी), कोईम्बतूर (1.02 कोटी), नागपूर (1.02 कोटी) आणि वांद्रे जंक्शन (1.01 कोटी) असा समावेश करण्यात आला आहे.