
inscription was found near the fort in Pendu Budruk Parbhani news
Nanded News : परभणी : जिल्ह्याच्या पालम तालुक्यातील पेंडू बुद्रुक येथे धुळगुंडे यांच्या गढीच्या बाजूस एक शिलालेख आढळून आला आहे. ऐतिहासिक ठेवा असलेला हा शिलालेख असून तो जवळपास ८०० ते ९०० वर्ष जुना आहे. हा शिलालेख गंगाखेड तालुक्यातील वाघलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील अभ्यासू शिक्षक बळीराम पवार व विजयकुमार बाबर यांना आढळून आला. ते एका लग्नासाठी त्या गावात गेले होते. त्यानंतर त्यांची याची माहिती शिलालेख संशोधक कृष्णा गुडदे यांना दिली.
गुडदे यांनी शिलालेखाचे छाप घेऊन वाचन करून महत्त्वपूर्ण माहितीचा उलगडा केला आहे. या दगडाला पूर्वी लोक ऊसन भरली की पाठ घासत असत. त्याने पाठीतील लचक कमी होते अशी गावकऱ्यांची धारणा होती. शिलालेखाची शिळा ८८ सेमी उंच तर २६ ते ३० सेमी रुंद आहे. त्यापैकी वरील बाजूस ५२ सेमी वर लेख कोरला आहे. या शिलालेखाच्या वरील बाजूस शिल्प अथवा देवता कोरलेल्या नाहीत. शिलालेख देवनागरी लिपीत आहे.
हे देखील वाचा : पतीची फेसबुक लाईव्हवर हत्या अन् बदलला राजकीय मार्ग; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश
यात मराठी व संस्कृत भाषा आहे. ओळी १० आहेत. शिलालेखात तिथी किवा राजवट विषयक मजकूर कोरलेला नाही. हा शिलालेख अक्षर वळण व भाषा यावरून १२ व्या शतकातील असावा, असे कृष्णा गुडदे यांनी सांगितले. अमरत्वाचा देव
अमरेश्वर म्हणजे अमर असणारांचा देव किया अमरत्त्वाचा देव. हा शब्द संस्कृतमधून आला आहे आणि सामान्यतः भगवान शिवाचे उपनाम किवा इतर नाव म्हणून वापरला जातो..
विशेषतः जिथे भगवान शिवाला समर्पित मंदिरे आहेत, जसे की उज्जैनमधील अमरेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि आंध्र प्रदेशातील अमरावतीमधील अमरेश्वर मंदिर, अमर याचा अर्थ कधीही मरणारा नाही किंवा सर्वकाळ जगगारा असा होतो.
ईश्वर याचा अर्थ स्भगवानर किवा स्वामीर असा होतो, अमरेश्वर हा शब्द भगवान शिवासाठी एक उपाधी जाती, जो त्यांना देवांचा स्वामी आणि अविनाशी म्हणून दर्शवितो. शिवपुराणानुसार, अमरेश्वर ज्योतिर्लिंग है उज्जैनमध्ये असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. आध्र प्रदेशातील अमरावती येथील अमरेश्वर स्वामी मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे.
हे देखील वाचा : नागपूरची थंडी नेत्यांना होईना सहन! हिवाळी अधिवेशनामध्ये दोन मंत्री,10 आमदार अन् 1355 कर्मचारी पडले आजारी
अवैध देशी दारू विक्री प्रकरणी गुन्हे दाखल
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत मरखेल पोलीस ठाण्याने अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये आरोपींविरुद्ध कारवाई करीत तब्बल ८१,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १३ डिसेंबर रोजी रात्री ९.४५ वाजता, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की हनेगाव येथून एक इसम मोटारसायकलवरून देशी दारू विक्रीसाठी वाहतूक करणार आहे. त्यानुसार हनेगाव चौक, ता. देगलूर येथे सापळा रचून बालाजी गणपतराव शिंदे (वय ३० वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. लोणी, ता. देगलूर, जि. नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले.