Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nilanaga Finance Scam: निलंगा रामजानकी फायनान्स घोटाळा; अटकपूर्व जामीन फेटाळूनही आरोपी मोकाट

या प्रकरणात यापूर्वी अटक झालेल्या व्यवस्थापक संतोष सुरवसे यांच्या मृत्यूनंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. काही ठेवीदारांच्या मते या प्रकरणातील सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 09, 2026 | 12:40 PM
Nilanaga Finance Scam: निलंगा रामजानकी फायनान्स घोटाळा; अटकपूर्व जामीन फेटाळूनही आरोपी मोकाट
Follow Us
Close
Follow Us:
  • ‘रामजानकी खाजगी फायनान्स’ घोटाळा प्रकरण आता अधिकच चिघळले
  • १ कोटी १३ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याने सामान्य ठेवीदार रस्त्यावर
  • जामीन अर्ज फेटाळूनही पोलिसांनी आरोपींना ताब्यात न घेतल्याने “राजकीय दबाव” असल्याचा संशय
Nilanaga Finance Scam: १५ टक्के व्याजदराचे आमिष दाखवून सर्वसामान्य ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या ‘रामजानकी खासगी फायनान्स’ प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. त्यामुळे तपासाच्या गतीबाबत ठेवीदारांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

विशेष म्हणजे, या प्रकरणातील आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. जामीन अर्ज फेटाळूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने ठेवीदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.

Parliament session : संसदीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु; जागतिक युद्धावरुन मोदी सरकारला पकडणार कोंडीत?

कायद्याची प्रक्रिया वेगाने व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ठेवीदारांकडून करण्यात येत आहे. राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चाना उधाण आले आहे. या प्रकरणात जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीच्या स्वीय सहाय्यकाचे नाव समोर आल्यामुळे या घोटाळ्याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. तथापि या संदर्भात संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. काही ठेवीदारांनी तपास प्रक्रियेत राजकीय दबाव असल्याचा संशय व्यक्त केला असला तरी याबाबत पोलिस प्रशासनाकडून अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

ठेवीदार आर्थिक अडचणीत

या प्रकरणात सुमारे १ कोटी १३ लाख रुपयांच्या ठेवी अडकल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यावसायिक आणि निवृत नागरिकांनी आपली बचत या फायनान्स संस्थेत गुंतवली असल्याचे सांगितले जाते. पैसे परत मिळण्यात विलंब होत असल्याने काही ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे त्यांनी सांगितले.
आमचे पैसे लवकरात लवकर परत मिळावेत, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Thane Crime: रक्ताने माखलेली कार सापडल्याने खळबळ; तपासात उघडकीस आला उबेर चालक हत्येचा धक्कादायक
सर्व व्यवहारांची चौकशी करण्याची होतेय मागणी

या प्रकरणात यापूर्वी अटक झालेल्या व्यवस्थापक संतोष सुरवसे यांच्या मृत्यूनंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
काही ठेवीदारांच्या मते या प्रकरणातील सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
हा प्रकार नेमका कसा घडला आणि ठेवीदारांचे पैसे कुठे गेले याचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडून व्हावा, अशी मागणीही पुढे येत आहे.

संचालकांची मालमत्ता जप्त करुन पैसे द्या

ठेवीदाराचे हितसंबंध संरक्षण कायद्यानुसार आरोपींची चल-अचल मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात लवकरात लवकर ठोस कारवाई न झाल्यास मोची, ठिय्या आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा काही ठेवीदारांनी दिला आहे.

रामजानकी फायनान्स प्रकरण सध्या निलंगा शहरात चर्वेचा विषय बनला असून पुढील काळात तपासाची दिशा काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Nilanga ramjanaki finance scam accuseds bail rejected why are police not making arrests yet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • Financial Scam
  • Latur news
  • nanded news

संबंधित बातम्या

Mythos AI: Digital जगाचा ‘मास्टर चोर’, Bank मध्ये खळबळ, सरकारचा ‘High-Alert’, तुमच्या मेहनतीची कमाई सुरक्षित आहे का?
1

Mythos AI: Digital जगाचा ‘मास्टर चोर’, Bank मध्ये खळबळ, सरकारचा ‘High-Alert’, तुमच्या मेहनतीची कमाई सुरक्षित आहे का?

Nanded News : ४७ अंशात चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ; पत्र्याच्या खोल्यांत स्कॉलरशिप परीक्षा
2

Nanded News : ४७ अंशात चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ; पत्र्याच्या खोल्यांत स्कॉलरशिप परीक्षा

जनगणनेसाठी तयारी झाली पूर्ण…! ९४ गावांत २०३ गटांची रचना, २५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
3

जनगणनेसाठी तयारी झाली पूर्ण…! ९४ गावांत २०३ गटांची रचना, २५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Maharashtra Politics : वादाची ठिणगी, संघर्षाचा ज्वालामुखी; नांदेड – परभणी भाजपमध्ये उफाळला असंतोष
4

Maharashtra Politics : वादाची ठिणगी, संघर्षाचा ज्वालामुखी; नांदेड – परभणी भाजपमध्ये उफाळला असंतोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.