Instamart delivers Dagdusheth Ganpati Bappa's prasad to your home in 10 minutes
पुणे : घराघरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. कुठे लाडू बनवण्याची लगबग आहे तर कुठे मखर तयार केले जात आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुण्यातील गणपतीचे एक प्रतिष्ठित मंदिर आहे. या मंदिरातील प्रसाद आता मुंबई आणि पुण्यामधील भाविकांना घरपोच मिळणार आहे. यासाठी इन्स्टामार्टने पुढाकार घेतला असून यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचा गोडवा अधिक वाढणार आहे.
मुंबई आणि पुण्यातील भाविक आता 27 ऑगस्ट रोजी इन्स्टामार्ट ॲपद्वारे बाप्पाचा आशीर्वादरूपी मोदकाचा प्रसाद ऑर्डर करू शकणार आहेत. या गणेश चतुर्थीला, भारतातील अग्रेसर जलद व्यापाराचे व्यासपीठ असलेले इन्स्टामार्ट, राज्यातील सर्वात पवित्र मोदक प्रसादांपैकी एक असलेला प्रसार काही मिनिटांत भाविकांच्या घरी थेट पोहोचवणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या भागीदारीत, इन्स्टामार्ट 27 ऑगस्ट रोजी मुंबई आणि पुण्यात घरोघरी डिलीव्हर करण्यासाठी प्रसिद्ध दगडूशेठ मोदक प्रसाद उपलब्ध करून देईल.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारतातील श्रद्धास्थान असलेल्या गणपती मंदिरांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे एक आध्यात्मिक स्थळ आहे. जेथे दरवर्षी लाखो भाविक आकर्षित होतात. मंदिरातील मोदक हा अत्यंत पवित्र प्रसाद आहेत, जो देवतेला मोठ्या प्रमाणात अर्पण केला जातो. हा प्रसाद इन्स्टामार्टवर उपलब्ध करून देऊन, जे भाविक प्रत्यक्ष मंदिरात येऊ शकत नाहीत त्यांना सुद्धा बाप्पाचा आशीर्वाद मिळू शकतो याची निश्चिती केली जाते. प्रत्येक बॉक्समध्ये एक मोदक असेल, ज्याची किंमत ₹50 आहे, आणि याचा 27 ऑगस्ट रोजी मर्यादित साठा उपलब्ध असणार आहे. अधिकाधिक भाविकांना प्रसादाचा आनंद घेता यावा यासाठी, प्रत्येक ऑर्डरमध्ये फक्त एकच मोदक उपलब्ध असेल.
या उपक्रमाबद्दल बोलतांना, इंस्टामार्टच्या महसुल आणि वाढ विभागाचे उपाध्यक्ष अर्जुन चौधरी म्हणाले, “गणेश चतुर्थी म्हणजे राज्यभरात भक्ती-भावाचे दिवस आणि या शुभ काळात दगडूशेठ मंदिरातील मोदकांना भाविकांसाठी प्रसाद म्हणून फारच महत्त्व आहे. दरवर्षी लाखो भाविक बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात येतात, परंतु आम्हाला माहिती आहे की, प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी प्रत्यक्ष येणे शक्य होत नाही – काही भक्त वृद्धापकाळाने, काही आरोग्याच्या समस्या असल्याने किंवा काहींना उत्सव काळातील गर्दीतुन प्रवास करणे नकोसे वाटते त्यामुळे. या उपक्रमामुळे आम्हाला दगडूशेठ बाप्पाचे आशीर्वाद त्यांच्या घरात त्यांना देता येतात, जेणेकरून कोणीही बाप्पाचा प्रसाद आणि आशीर्वाद घेण्याच्या आनंदापासून वंचित राहणार नाही.”
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गेल्या काही वर्षांत, गणेश चतुर्थीच्या काळात मोदक हे सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या मिठाईंपैकी एक ठरले आहे. या वर्षीही इन्स्टामार्टमध्ये या पदार्थाची निवड ग्राहकांची वाढलेली दिसून येते, मोदक, मोदक साचा, मोदक पीठ, काजू मोदक आणि चॉकलेट मोदक यांसारखे पदार्थ सर्वोत्तम सर्च केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये दिसतात तसेच भागीरथी मोदक पीठ आणि मोदक अॅक्सेसरीज घेण्याचा कल सुद्धा जास्त असल्याचे लक्षात येते. पर्यावरणपूरक गणपती मूर्ती, नारळ, फुले आणि दिवे यांसारख्या प्रसादाच्या आवश्यक वस्तूंसोबत, एक आवश्यक आणि भेटवस्तू श्रेणीमध्ये फार प्रसिद्ध होत असलेली भेट दोन्ही म्हणून मोदकाचे स्थान मात्र उत्सवाच्या खरेदी सूचीत महत्त्वाचे ठरत आहे.
गणेशोत्सवासाठी खास तयारी
या वर्षी, इन्स्टामार्टने त्यांच्या उत्सवाच्या श्रेणीचा विस्तार केला आहे ज्यामध्ये 25+ SKUs मोदक, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि श्री सिद्धिविनायक चंडीचा गणपती मंदिर येथे मिळणारा प्रसाद, तसेच पूजेसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. प्रतिष्ठित दगडूशेठ मोदक अवघ्या 10 मिनिटांत उपलब्ध करून देऊन, इन्स्टामार्ट आजच्या वेगवान जगात परंपरा जिवंत ठेवून, सर्वात महत्त्वाच्या आणि भाव-भक्तीशी संबंधित गोष्टींशी प्रामाणिक राहून त्यांच्या उत्सवाच्या सुविधांचा विस्तार करत आहे.