Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर शहर भाजपमध्ये धुसफूस; कार्यकारिणी निवड जाहीर करताच ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

सोलापूर शहर कार्यकारिणी निवडीच्या निमित्ताने सोलापूर भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. जुन्या निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून आलेल्यांनाच संधी देण्यात आल्याचा आरोप होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2025 | 11:56 AM
खोपोलीत भाजपाला मोठा धक्का

खोपोलीत भाजपाला मोठा धक्का

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : सोलापूर शहर कार्यकारिणी निवडीच्या निमित्ताने सोलापूर भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. ज्येष्ठ नेत्या रोहिणी तडवळकर यांची पक्षाने ४ महिन्यापूर्वी मे महिन्यात शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. परंतु आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांना ती मान्य नव्हती. तडवळकर यांच्या पदभार स्वीकृती कार्यक्रमासही दोन्ही आमदार उपस्थित राहिले नव्हते. याच अंतर्गत वादामुळे सुमारे चार महिने कार्यकारिणीची निवड लांबणीवर पडली होती. बुधवारी (दि. १० सप्टेंबर) अखेर तडवळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर केली. मात्र त्यात जुन्या निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून आलेल्यांनाच संधी देण्यात आल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे दुपारी बाराच्या सुमारास शहराध्यक्षांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली व नूतन उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी तासाभरातच आपण या पदाचा राजीनामा देत असल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले. जाधव हे आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक आहेत. देशमुखांच्या नेतृत्वात पक्षकार्य करत राहू, असे त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

जाधवांना दुय्यम पद, आमदार पूत्राचेही नाव कापले

अनंत जाधव जुने कार्यकर्ते आहेत. ते शहर अध्यक्षपदाच्या स्पर्धेत होते. परंतु पक्षाने दोन्ही आमदार देशमुख समर्थकांना बाजूला सारून तडवळकर यांना निवडले. त्यामुळे जाधव नाराज होते. त्यातच आता उपाध्यक्षपदावर बोळवण केलेली त्यांना मान्य नाही. मागच्या कार्यकारिणीत आमदार विजयकुमार देशमुखांचे पूत्र किरण देशमुख यांच्यासह अनेक समर्थकांना डावलले.

इन्कमिंग वाढल्याने निष्ठावंत बाजुला

भाजपत इन्कमिंगचा ओघ वाढल्याने निष्ठावंत बाजुला पडत आहेत. महिला आघाडीच्या अध्यक्षपदासाठी विजया वड्डेपल्ली, इंदिरा कुडक्याल या इच्छुक होत्या. पण पाच वर्षांपूर्वीच आलेल्या रंजिता चाकोते यांना संधी देण्यात आली. काँग्रेसमधून आलेले देवेंद्र भंडारे, वैष्णवी करगुळे यांना कार्यकारिणीत, शिवसेनेतून आलेले संजय साळुंखे यांना थेट सरचिटणीसपदाचे बक्षीस देण्यात आले.

बुद्धिजीवी सेलसाठी प्रमुख सापडेना

नव्या कार्यकारिणीत नऊ उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस व १२ चिटणीस व ५४ सदस्यांचा समावेश आहे. कोषाध्यक्ष, कार्यालय प्रमुख, प्रसिद्धी प्रमुख पदासाठी प्रत्येकी एक नाव आहे. भाजयुमोसह पक्षाच्या इतर मोर्चाचे ५ अध्यक्ष जाहीर करण्यात आले. मात्र किसान मोर्चाच्या अध्यक्षपदासाठी पक्षाला अजून उमेदवार सापडलेला नाही. विविध आघाडी व सेलचे २० प्रमुख (संयोजक) जाहीर झाले. यातही दक्षिण भारतीय सेल, दिव्यांग सेल व बुद्धिजीवी सेलच्या प्रमुखपदी माणूस सापडलेला नाही. कार्यकारिणीत सात पदे रिक्त ठेवण्यात आली.

कार्यकारिणीत ७ पदांच्या समोरील नावे रिक्त ठेवली आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर तडवळकर म्हणाल्या, अजून आमदारांचा निरोप यायचा आहे. प्रदेश कार्यालयाच्या मंजुरीनेच यादी जाहीर केली. अनंत जाधव यांचा राजीनाम्याबाबत प्रदेश कार्यालयास कळवू. -रोहिणी तडवळकर, शहराध्यक्षा

Web Title: Internal dispute within solapur city bjp has come to the fore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Ravindra Chavan
  • Solapur News

संबंधित बातम्या

Ravindra Chavan lungi look : महायुतीच्या सभेमध्ये रवींद्र चव्हाणांचा लुंगी लूक; रसमलाई इफेक्ट म्हणत संजय राऊतांचा घणाघात
1

Ravindra Chavan lungi look : महायुतीच्या सभेमध्ये रवींद्र चव्हाणांचा लुंगी लूक; रसमलाई इफेक्ट म्हणत संजय राऊतांचा घणाघात

Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा
2

Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Raj Thackeray Thane Speech: पाच पाच हजार रुपये तोंडावर फेकून मते मिळवण्याची हिंमत आली कुठून? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
3

Raj Thackeray Thane Speech: पाच पाच हजार रुपये तोंडावर फेकून मते मिळवण्याची हिंमत आली कुठून? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

Raj Thackeray on BJP: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; ‘पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे
4

Raj Thackeray on BJP: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; ‘पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.