Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv ZP Politics: धाराशिवच्या ‘शिंदे सेनेत’ उभी फूट! सभापती पदावरून बड्या नेत्याचा राजीनाम्याचा इशारा

धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुती (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट) एकत्र आली असून, सत्तेचे समतोल वाटप करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 28, 2026 | 01:08 PM
Dharashiv Zilla Parishad, Anand Patil Resignation, Archana Patil BJP,

Dharashiv Zilla Parishad, Anand Patil Resignation, Archana Patil BJP,

Follow Us
Follow Us:

Dharashiv ZP Politics: सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणूक आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काळात भाजप आणि शिंदे गटातील संघर्ष चांगलाच चर्चेत होता. त्यानंतर आता धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदावरून शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश मानत नसल्याचा आरोप शिंदे सेनेचे लोकप्रभा प्रमुख आनंद पाटील यांनी केला आहे. या वादामुळे आनंद पाटील आणि त्यांच्या मातोश्रींनी जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

आनंद पाटील आणि त्यांच्या मातोश्री कानेगाव जिल्हा परिदेच्या सदस्य आहेत. त्यांना सभापती पदापासून डावलल्यामुळे दोन्ही नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त करत थेट राजीनाम्याचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी एकनाथ शिंदेचा आदेश पाळत नसल्याचा आरोप केला आहे. शिंदे गटात गटबाजी वाढत चालल्याने निराश होऊन त्यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला आहे. या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू आहे.

LPG Cylinder Rate: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री? घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ; तुमच्या शहरातील

धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुती (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) एकत्र आली असून, सत्तेचे समतोल वाटप करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या अर्चना पाटील विराजमान आहेत. अर्चना पाटील या भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. तर उपाध्यक्षपद शिंदे गटाकडे असून, माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड या उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; पदवाटप निश्चित

धाराशिव जिल्हा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती एकत्र आली असून, पदवाटपही निश्चित करण्यात आले आहे. भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (सुनेत्रा पवार गट) यांच्यात समन्वय साधत सत्ता समीकरणे ठरवण्यात आली आहेत.

भाजपकडे दोन महत्त्वाची सभापती पदे
जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्ष कडे दोन महत्त्वाची सभापती पदे आहेत.
अर्थ व बांधकाम समितीचे सभापतीपद सिद्धेश्वर कोरे यांच्याकडे देण्यात आले आहे
समाजकल्याण समितीचे सभापतीपद विश्वास कोकणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे

Middle East Tension : होर्मुझवर आता राज करणार ट्रम्प? त्यांच्या ‘या’ एका विधानाने जगात खळबळ;

राष्ट्रवादीकडे कृषी विभाग
राष्ट्रवादी काँग्रेस (सुनेत्रा पवार गट) कडे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतीपद देण्यात आले आहे. हे पद भाऊसाहेब खरसडे यांच्याकडे आहे.

शिंदे गटाकडे बालकल्याण विभाग
शिवसेना (शिंदे गट) कडे बालकल्याण समितीचे सभापतीपद देण्यात आले असून, पूजा शिंदे या या पदावर कार्यरत आहेत.

महायुतीची स्थानिक पातळीवर मजबूत पकड
या पदवाटपामुळे महायुतीने धाराशिव जिल्हा परिषदेत आपली सत्ता मजबूत केल्याचे दिसत आहे. विविध पक्षांमध्ये समन्वय साधत सत्ता संतुलन राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राजकीय समीकरणे आणि वर्चस्व
धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणात शिंदे गटाचे नेते आनंद पाटील आणि त्यांच्या मातोश्री (कानेगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या) यांचाही महत्त्वाचा सहभाग आहे. महायुतीने सर्व घटक पक्षांना सामावून घेत जिल्हा परिषदेचा गाडा हाकण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः अर्थ, बांधकाम आणि समाजकल्याण ही महत्त्वाची खाती भाजपने आपल्याकडे राखली आहेत, तर कृषी आणि बालकल्याण ही पदे मित्रपक्षांना देण्यात आली आहेत.

Web Title: Internal rift in dharashiv shinde sena anand patil threatens resignation over sabhapati post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Dharashiv News
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’!  राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप
1

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’! राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप

Kailas Patil on Opreation Tiger: मला फुटायचे असते तर सुरत बॉर्डरवरून परतलोच नसतो ! कैलास पाटलांनी स्पष्टचं सांगितलं
2

Kailas Patil on Opreation Tiger: मला फुटायचे असते तर सुरत बॉर्डरवरून परतलोच नसतो ! कैलास पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ‘ऑपरेशन टायगर 2.0’मुळे ठाकरे गटाला धक्का; आणखी 14 आमदार शिंदे गटात जाण्याची चर्चा
3

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ‘ऑपरेशन टायगर 2.0’मुळे ठाकरे गटाला धक्का; आणखी 14 आमदार शिंदे गटात जाण्याची चर्चा

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना मोठा दणका; सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, पैशांची होणार वसुली
4

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना मोठा दणका; सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, पैशांची होणार वसुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.