सांगली जिल्ह्यात 35 टक्के खरीप पेरण्या पूर्ण; सोयाबीनमध्ये घट होणार?
सांगली/प्रवीण शिंदे : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीचे सरासरी क्षेत्र दोन लाख ४६ हजार ६११८.७१ हेक्टर आहे. यापैकी ८४ हजार ८३६.४० हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ३५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक ७५.३१ टक्के पेरणी झाली असून, सोयाबीन पेरणीत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, वाढते ऊस क्षेत्र आणि सोयाबीन दराचा फटका बसणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेला पाऊस जूनपर्यंत सुरू राहिला. जूनमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पेरणीला गती आली आहे. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना मुदतपूर्व पेरणी न करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार १५ जूननंतर पेरणी सुरू झाली. मागील आठवड्यात पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे पेरणीला गती आली. यंदा खरीप हंगामात एकूण दोन लाख ४६ हजार ११८.७१ हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केले आहे. त्यापैकी आतापर्यंत ८४ हजार ८३६.४० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
या तालुक्यात सर्वाधिक पेरणी
जत, मिरज, वाळवा, शिराळा, कवठेमहांकाळ, पलूस तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. जिल्ह्यात भात २०.१०, ज्वारी २.८२, बाजरी ५९.९५, मका ४०.३९, कडधान्य ४९.७२, तर भुईमूग २१.१४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीत बाजरी, कडधान्य, मका पिकाची आघाडी असून, त्यापाठोपाठ उडीद, सोयाबीन या पिकांचा समावेश होतो.
पीकनिहाय पेरणी
पीक टक्केवारी
भात २०.१०
ज्वारी २.६३
बाजरी ५९.९१
मका ४०.३९
तूर ७४.४०
मूग २९.३७
उडीद ५५.२९
भुईमूग २१.१४
सोयाबीन २१.१४
तालुकानिहाय पेरणीची टक्केवारी
मिरज – २१.३७
जत – ७५.३१
खानापूर – ०.९६
वाळवा – २१.९९
तासगाव – ३.५३
शिराळा – १९.६३
आटपाडी – १२.१९
क. महांकाळ – ५६.५३
पलूस – २३.६२
कडेगाव -१२.९४
हे सुद्धा वाचा : महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेणं भोवलं; ACB ने रंगेहात पकडले