Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर नसीम खान आक्रमक; सरकारवर केली जोरदार टीका

भाजपा सरकार मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाच्या विरोधी आहे, असे माजी मंत्री व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांनी म्हटले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 19, 2026 | 12:00 PM
मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर नसीम खान आक्रमक; सरकारवर केली जोरदार टीका

मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर नसीम खान आक्रमक; सरकारवर केली जोरदार टीका

Follow Us
Follow Us:
  • भाजपा सरकार अल्पसंख्याक विरोधी
  • अल्पसंख्याक समाजाला विकासासाठी दूर ठेवण्याचा प्रयत्न
  • नसीम खान यांची टीका
मुंबई : राज्यातील भाजपा महायुती सरकारने मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा व अल्पसंख्याक समाजावर अन्याय करणारा आहे. आरक्षण रद्द करुन भाजपा सरकारने अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे पाप केले असून, भाजपा सरकार मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाच्या विरोधी आहे, असे माजी मंत्री व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांनी म्हटले आहे.

 

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नसीम खान पुढे म्हणाले की, मुस्लीम समाजातील ५ टक्के आरक्षण रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. २०१४ साली काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लीम समाजातील मागास घटकांना ५ टक्के शैक्षणिक व नोकरीत आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला होता, त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्या अध्यदेशावर पुढील निर्णय घेतला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लीम समाजातील मागास घटकांना ५ टक्के शैक्षणिक आरक्षण देण्याचा अंतरिम आदेश दिला होता. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात हे आरक्षण सुरु झाले होते. पुढे न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी भाजपा सरकारने केली नाही. आम्ही हा मुद्दा सातत्याने लावून धरला त्यावेळी भाजपा सरकारने आश्वासन दिले होते पण त्याची पूर्तता केली नाही.

काँग्रेस आघाडी सरकारने अल्पसंख्याक समाजासाठी सुरु केलेल्या सर्व योजना बंद केल्या आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सुरु केली होती पण भाजपा सरकार तीही देत नाही. यासाठी वर्षाला ९० कोटी रुपये लागतात पण सरकारने २० कोटी रुपये दिले आहेत. अल्पसंख्याक समाजात फक्त मुस्लीमच येत नाहीत तर जैन, शिख, पारसी, हे समाज घटकही येतात, असेही नसीम खान म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी काही शाळांना अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र देण्याचा प्रकार निंदनीय आहे. अल्पसंख्याक विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे, प्रत्येक प्रमाणपत्रासाठी ५ ते १० लाख रुपये घेण्यात आल्याची आपल्याकडे माहिती आहे. ७० ते ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिला असून काही मोठ्या शिक्षण संस्थांना हे प्रमाणपत्र वाटण्यात आले आहे. आरटीई च्या कायद्यातून गरिबांना मोफत शिक्षणाचा अधिकार युपीए सरकारने दिला, त्यापासून सुटका करुन घेण्यासाठी अशा प्रकारे अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र घेतली जातात. सरकारने ही प्रमाणे पत्रे रद्द करावीत आणि या प्रकरणाची सीआयडी अथवा एसआयटी मार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, असेही नसीम खान म्हणाले.

हे सुद्धा वाचा : काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार; ‘या’ प्रश्नांवरुन बड्या नेत्याचा इशारा

Web Title: Naseem khan criticizes government after cancelling reservation for muslim community

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Muslim
  • Muslim Community

संबंधित बातम्या

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
1

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
2

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद
3

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच ABVP-NSUI वाद चिघळला; विद्यार्थिनींना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप
4

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच ABVP-NSUI वाद चिघळला; विद्यार्थिनींना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.