Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावरकरांवरील ‘त्या’ वक्तव्यावर राहुल गांधी ठाम; बदनामीच्या खटल्यात नाकारले दोषारोप

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी दाखल बदनामीप्रकरणातील खटल्यात दोषी नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 12, 2025 | 03:51 PM
सावरकरांवरील 'त्या' वक्तव्यावर राहुल गांधी ठाम, बदनामीच्या खटल्यात नाकारले दोषारोप

सावरकरांवरील 'त्या' वक्तव्यावर राहुल गांधी ठाम, बदनामीच्या खटल्यात नाकारले दोषारोप

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी शुक्रवारी पुणे न्यायालयात मोठा दावा केला आहे.  राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी एक विधान केले होते. या विधानानंतर दाखल बदनामीप्रकरणातील खटल्यात दोषी नसल्याचा दावा गांधींच्या वकिलांनी केला आहे. विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पुण्याच्या विशेष न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. विशेष न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावरील आरोप वाचून दाखवला. राहुल गांधी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नव्हते. त्यांची बाजू मांडणारे अॅड. मिलिंद पवार यांनी राहुल गांधी दोषी नाहीत, असा दावा यावेळी न्यायालयात केला. २९ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मागील सुनावणीत विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा दिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कथित बदनामीकारक वक्तव्य करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संदर्भ दिलेल्या पुस्तकाची प्रत न्यायालयात सादर करण्याची सात्यकी सावरकर यांची मागणी पुण्याच्या विशेष न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणी खटला सुरू होण्यापूर्वी आरोपीला कोणतीही कागदपत्रे सादर करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही; अन्यथा राज्यघटनेच्या कलम २० (३) अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होईल, असे नमूद करून विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी, तक्रारदाराला कोणतीही माहिती देण्याचे बंधन आरोपीवर नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला होता.

हे सुद्धा वाचा : बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाई कधी होणार? खोटी प्रमाणपत्र सादर करुन घेतली सवलत

काय आहे प्रकरण?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटन दौऱ्यात पाच मार्च २०२३मध्ये ‘ओव्हरसीज काँग्रेस’च्या मेळाव्यात भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या मित्रांसमवेत एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केल्याने आनंद झाल्याचे एका पुस्तकात लिहिल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. त्यावर हे विधान खोटे आणि अवमानकारक असल्याची तक्रार सात्यकी सावरकर यांनी केली आहे.

Web Title: It has been reported that rahul gandhi is adamant on his controversial statement on savarkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • MP Rahul Gandhi
  • Swatantra Veer Savarkar

संबंधित बातम्या

Chiplun News: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीसाठी काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात; तर राष्ट्रवादी…
1

Chiplun News: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीसाठी काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात; तर राष्ट्रवादी…

दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली
2

दिलेला शब्द 24 तासात पूर्ण; हिराबाग सोसायटीतील कचऱ्याची समस्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सोडविली

Rahul Gandhi: “भाजप आणि आरएसएस सत्तेचे केंद्रीकरण करतात…”, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा
3

Rahul Gandhi: “भाजप आणि आरएसएस सत्तेचे केंद्रीकरण करतात…”, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

राजकीय हालचालींना वेग, पिंपरीत आता वेध महापौरपदाचे; कोणाला मिळणार मान?
4

राजकीय हालचालींना वेग, पिंपरीत आता वेध महापौरपदाचे; कोणाला मिळणार मान?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.