
मुंबई: राज्यात सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ‘ऑपरेशन टायगर’बाबत जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि ठाकरे गटातील काही मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठे विधान केले आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, दोन्ही शिवसेना जोडण्याची वेळ आली असून, अद्याप दोघांमधील अंतर फार वाढलेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अशा प्रयत्नांसाठी दोन्ही बाजूंनी सहकार्य गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
Budget 2025 : करदात्यांपासून ते महिलांपर्यंत, अर्थसंकल्पातील या १० घोषणांकडे असणार
महायुतीकडून महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी?
राज्यातील गेल्या दोन मोठ्या निवडणुकांमध्ये अनेक राजकीय उलथापालट झाल्या. काही नेत्यांनी पक्षांतर केले, काहींना यश मिळाले तर काहींना अपयश. आता आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच, महायुतीतील पक्ष काँग्रेस आणि ठाकरे गटातील नेत्यांना आपल्या गटात सामील करून महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
फेब्रुवारीचा पहिला दिवस या राशीच्या लोकांसाठी कसा राहील, ते जाणून घ्या
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांना आपल्या गटात सामील करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. तसेच, कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे तेही शिंदे गटात जाणार का, याबाबत चर्चा रंगली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी विकासकामांसाठी ही भेट घेतल्याचे स्पष्ट केले असून, सध्या तरी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या संभाव्य पक्षांतराबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’ होणारच…; महायुतीच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
कोथरूडचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचे शिवसेना शिंदे गटात संभाव्य प्रवेशाबद्दल चर्चाही सुरू आहे. पुण्यातील तीन माजी आमदार, ज्यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, महादेव बाबर आणि चंद्रकांत मोकाटे यांचा समावेश आहे, हे सर्व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्याची शक्यता आहे. पुण्यात होणाऱ्या या “ऑपरेशन टायगर”ला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) ला धक्का देण्यासाठी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय केले आहे. दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर (पुणे – कसबा जागा) आणि शिवसेनेचे (यूबीटी) माजी आमदार महादेव बाबर (पुणे – हडपसर जागा), माजी आमदार सुभाष बने (रत्नागिरी – संगमेश्वर जागा), माजी आमदार गणपत कदम ( माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (रत्नागिरी- राजापूर जागा), माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (पुणे- कोथरूड जागा) आणि विद्यमान आमदार यांच्यासह महाविकास आघाडीचे काही मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत.