अजित पवारांच्या खात्यावर नजर ठेवा, एकनाथ शिंदेंच्या आमदारांना सूचना, नक्की काय आहे प्रकरण?
नागपूर: सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काही खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. तसेच खासदारांनीही अद्याप त्यांच्या भूमिका स्पष्ट केलेल्या नाहीत. पण त्याचवेळी राज्याच्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र ऑपरेशन टायगरबाबत मोठं विधान केलं आहे. येत्या काही दिवसातच महाविकास आघाडीत मोठी फूट पडेल, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
महाजन यांच्या मते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांचे अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी सध्या महायुतीच्या संपर्कात आहेत. हे सर्व खासदार आणि पदाधिकारी महायुतीत प्रवेश करणार आहेत. याशिवाय अनेक नगरसेवकही मुख्य प्रवाहात सहभागी होण्यास इच्छुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. काही दिवसांतच याबाबत चित्र स्पष्ट होईल, असा इशाराही महाजन यांनी विरोधकांना दिला.
Devendra Fadnavis: ‘यमुने’वरून राजकारण तापलं; फडणवीसांची केजरीवालांवर टीका
दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून तणाव वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकसाठी दावा केला असून, शिवसेनेने रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची मागणी केली आहे. मात्र, भाजपने गिरीश महाजन यांना नाशिकचा पालकमंत्री नियुक्त केल्यानंतर वाद अधिकच उफाळला. त्यामुळे महायुतीने सध्या नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिली आहे. तिन्ही पक्षांनी आपल्या नेत्याला पालकमंत्री करण्याची मागणी केली असून, यावर लवकरच तोडगा निघेल, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोथरूडचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचे शिवसेना शिंदे गटात संभाव्य प्रवेशाबद्दल चर्चाही सुरू आहे. पुण्यातील तीन माजी आमदार, ज्यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, महादेव बाबर आणि चंद्रकांत मोकाटे यांचा समावेश आहे, हे सर्व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्याची शक्यता आहे. पुण्यात होणाऱ्या या “ऑपरेशन टायगर”ला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.
Rashtrapati Bhavan marriage ceremony: राष्ट्रपती भवनात वाजणार सनई- चौघड्यांचे सूर
महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) ला धक्का देण्यासाठी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय केले आहे. दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर (पुणे – कसबा जागा) आणि शिवसेनेचे (यूबीटी) माजी आमदार महादेव बाबर (पुणे – हडपसर जागा), माजी आमदार सुभाष बने (रत्नागिरी – संगमेश्वर जागा), माजी आमदार गणपत कदम ( माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (रत्नागिरी- राजापूर जागा), माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (पुणे- कोथरूड जागा) आणि विद्यमान आमदार यांच्यासह महाविकास आघाडीचे काही मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत.