Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: १० थरांची हॅट्रिक करणारा जय जवान यंदा ९ थरांवरच अडकला! मैदानात नेमकं काय घडलं?

Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: दहीहंडीच्या दिवशी जय जवान गोविंदा पथकाने यंदा ११ थरांचा मनोरा रचण्याचे लक्ष्य ठेवले होते. गेल्या काही वर्षांपासून १० थर सहज रचणाऱ्या या पथकाकडून यंदा विक्रमाची अपेक्षा होती. मात्र दिवसभरात चार वेळा १० थर रचण्याचा प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी त्यांना अपयश आले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 06, 2026 | 11:22 AM
Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

काल संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा जोर होता. ‘गोविंदा आला रे आला’च्या आवाजात सगळं वातावरण दणाणून गेलं. मुंबई, ठाण्यात तर एकापेक्षा एक उंच मानवी मनोरे बघायला मिळाले. जय जवान गोविंदा पथकाकडे नागरिक गर्दी करुन पाहत होते. हे पथक नेहमीच काहीतरी विक्रम रचत . यंदा या पथकाचे 11 थर लावण्याचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र कालचा दिवस त्यांच्यासाठी चांगला नव्हता. गेल्या काही वर्षांपासून हे पथक 10 थर आरामात लावले. लोकांना वाटलं होतं की यंदा 11 थरांचा इतिहास घडेल. पण यंदा 10 थर पण लागले नाहीत. दिवसभरात चारवेळा त्यांनी 10 थर लावायचा प्रयत्न केला, पण चारही वेळा अपयश आलं. Jai JawanGovinda Pathak Dahi Handi 2026:

नेमकं दिवसभरात काय घडलं?

जय जवानच्या पोरांनी यंदा 11 थरासाठी खूप मेहनत घेतली होती. सकाळपासूनच त्यांचा जोश पाहायला मिळाला. सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी 10 थरांचा मनोरा बनवायचा प्रयत्न केला. खालून वरपर्यंत सगळे गोविंदा चढले, लोकांनी टाळ्या वाजवल्या, पण शेवटी वर जाऊन तोल गेला आणि सगळा थर खाली कोसळला. दोन्ही वेळा हेच झालं. दुपारी एका ठिकाणी त्यांनी 9 थर लावले. 9 थर तर एकदम व्यवस्थित लागले. सगळ्यांना वाटलं चला आता सलामी होईल. सलामी देऊन खाली उतरताना अगदी शेवटच्या क्षणी तोल गेला आणि परत सगळं पडलं.

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, भरती परीक्षांसाठी फडणवीस सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

शेवटच्या क्षणी

शेवटचा प्रयत्न त्यांनी ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीला केला. तिथे सुद्धा दोनवेळा 10 थर लावायचा प्रयत्न केला. परंतू तिथे पण तोच अनुभव आला. थर काही पूर्ण लागलाच नव्हते. दरवर्षी विक्रम करणारं पथक यंदा काहीच करू शकलं नाही, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये नैराश्य पाहायले मिळाले. पथकामधील 20 गोविंदा आजारी असल्याचे पथक प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी माहिती दिली आहे.

प्रशिक्षक नेमकं काय म्हणाले?

ते म्हणाले की, यंदा आम्ही 4 महिने तयारी करत होते. रोज सरावाने 11 थर लागतीलच अशी पूर्ण तयारी होती. पण पावसाने सगळा प्लॅन बिघडवला.सततच्या पावसामुळे पथकातले जवळपास 20 मुख्य गोविंदा आजारी पडले. त्यातले काही तर मेन पोझिशनवर खेळणारे होते. खालच्या थरातले आणि वरच्या थरातले महत्त्वाचे खेळाडूच आजारी पडल्यामुळे सरावाला मोठा ब्रेक लागला. शेवटच्या काही दिवसात व्यवस्थित सरावच झाला नाही . त्यामुळे ऐनवेळी कॉम्बिनेशन बिघडलं आणि थर लागताना तोल सांभाळणं कठीण झालं.

पुढे ते म्हणाले की, खरं तर दहीहंडीत फक्त ताकदीचा नाही तर टीमवर्क आणि सराव खूप महत्त्वाचा असतो. एक जण जरी आजारी पडला तरी पूर्ण थरावर परिणाम होतो. इथे तर 20 जण आजारी होते. त्यामुळे जय जवानला यंदा अपेक्षित यश मिळालं नाही.पण हरकत नाही, खेळात हार-जीत होतच असते. जय जवानने आजपर्यंत खूप विक्रम केले आहेत आणि पुढे पण ते नक्कीच 11 थरांचा विक्रम करतील अशी आशा सगळ्यांना आहे. गोविंदा पथकांचं कौतुक यासाठीच आहे की पडले तरी परत उठून प्रयत्न करतात.

Web Title: Jai jawan dahi handi 2026 10 tier champions stopped at 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Dahi Handi 2026
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट; १६८ गोविंदा जखमी, थरावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू, तर खांब कोसळून चिमुकल्याचा अंत
1

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट; १६८ गोविंदा जखमी, थरावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू, तर खांब कोसळून चिमुकल्याचा अंत

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
2

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

Dahi Handi : दहीहंडीच्या उत्सवाला नशामुक्त महाराष्ट्राची जोड; फडणवीसांचे गोविंदा पथकांना आवाहन
3

Dahi Handi : दहीहंडीच्या उत्सवाला नशामुक्त महाराष्ट्राची जोड; फडणवीसांचे गोविंदा पथकांना आवाहन

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
4

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.