Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
Jalgaon Crime: गणपतीच्या आगमनासाठी पूजेची तयारी सुरू होती, माय-लेक …
इंदूर-हैदराबाद महामार्ग क्रमांक 753 चे काम सध्या तिथे सुरु आहे आणि त्याच कामासाठी हा डंपर तिथे होता.धडक इतकी जोरात होती की प्रल्हाद हिवरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात किती भीषण होता याचा अंदाज यावरून लावा की त्यांचं डोकं धडापासून वेगळं झालं होतं. हे दृश्य बघून तिथे असलेल्या लोकांच्या अंगावर काटा आला.तर त्यांच्यासोबत असलेले ईश्वर पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लगेचच मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
अपघाताची बातमी कळताच मुक्ताईनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर रक्त पडलं होतं आणि दुचाकीचा चक्काचूर झाला होता.पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीमला पण बोलावलं. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला? डंपर चालकाचा वेग जास्त होता का? की दुचाकीचालकाचं नियंत्रण सुटलं? याचा तपास पोलिस करत आहेत.रात्री उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं.
Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ …
या अचानक घडलेल्या घटनेमुळे अजंदे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रल्हाद हिवरे हे गावात चांगले ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठं संकट आलं आहे. घरात एकच आक्रोश सुरु आहे.स्थानिक लोकांनी सांगितलं की या महामार्गाचं काम सुरु असल्यापासून तिथे मोठ्या गाड्यांची वर्दळ वाढली आहे आणि अपघात पण वाढले आहेत. कंपनीच्या गाड्या भरधाव वेगाने चालवतात आणि त्याचा फटका सामान्य लोकांना बसतो. यावर पोलिसांनी लक्ष द्यावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.सध्या पोलिस पुढील तपास करत आहेत आणि डंपर चालकाचा शोध घेत आहेत.






