Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
जळगाव गावात चादरी विक्रीचा बहाणा करून फिरणारे तरुण प्रत्यक्षात बँक लुटण्याच्या तयारीत असल्याची कुणालाही पुसटशी कल्पना नव्हती. बँकेच्या कामकाजावर पाळत ठेवली, कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या सुट्टीची वेळ साधली आणि अचानक बंदुकीच्या धाकावर थेट स्टेट बँकेच्या स्ट्रांग रूमकडे मोर्चा वळवला! काही क्षणांतच बँकेत एकच गोंधळ उडाला. मात्र, दरोडा टाकून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या या सशस्त्र टोळीला गावकऱ्यांच्या सतर्कतेने मोठा धक्का बसला. Jalgaon News:
गावकऱ्यांनी पाठलाग करून तीन दरोडेखोरांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. जळगाव तालुक्यातील भोकर येथे शनिवारी दुपारी घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर दरोडा टाकण्यासाठी सात ते आठ जणांची टोळी काही वेळापासून टेहळणी करीत होती. गावात काही तरुण चादरी विक्रीसाठी फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले होते.
Jalgaon News: कचरा व्यवस्थापनासाठी पालकमंत्र्यांचा ‘ॲक्शन प्लॅन’
बैंकेतील गोंधळाची माहिती बाहेर येताच गावक-यांना सशय आला. चादरी विक्रीच्या बहाण्याने गावात फिरणारे तरुणच या दरोड्यात सहभागी असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी दरोडेखोर आणि गावक-यांमध्ये झटापट झाली, काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर तिघांना गावकऱ्यांनी पकडून ठेवले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
“भोकर येथील स्टेट बैंक दरोडा प्रकरणात धरणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांत धडाकेबाज कारवाई करत चावलखेडा रेल्वे बोगद्याजवळ दोन संशयितांना बेड्या ठोकल्या. शंकर रमेश जासक (वय ४२, रा. मुक्ताईनगर, सध्या जळगाव) आणि गजानन राजेंद्र पवार (वय ३२. स. नायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी नाकाबंदी करून दोघांना पकडले. त्यांच्याकडून संशयास्पद बेंगा जप्त करण्यात आल्या असून, त्यात दरोड्यातील रोकड किवा सोन्याचे दागिने असण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांच्या मदतीने यापूर्वी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यामुळे त्याच्या हालचालींकडे कुणाचे विशेष लक्ष गेले नाही. मात्र, याच चादरी विक्रेत्यांच्या वेशातील तरुणाच्या मनात बैंक लुटण्याचा डाव शिजत असल्याचे नंतर उघड झाले.
Jalgaon News: 13 शिक्षकांच्या पदस्थापनेत नेमकं काय घडलं? सामान्य …
बँकेतील कर्मचारी जेवणाच्या सुट्टीसाठीची वेळ साधत टोळीने अचानक बैंकेत प्रवेश केला. हातात शस्त्रे आणि बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी बैंक कर्मचा-यांना एका जागी रोखून धरले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कर्मचा-यांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली, त्यानंतर दरोडेखोरांनी स्ट्रॉग रूममधील लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या बिस्किटांसह दागिन्यांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. हाताला लागेल तेवढी रोकडही बॅगांमध्ये भरण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
Ans: जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दरोड्याचा प्रयत्न झाला.
Ans: चादरी विक्रीचा बहाणा करून गावात फिरणाऱ्या टोळीने कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या सुट्टीची वेळ साधून बँकेत प्रवेश केला.
Ans: त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून स्ट्राँग रूममधील सोन्याचे बिस्किट, दागिने आणि रोकड लुटण्याचा प्रयत्न केला.






