Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी

Jalgaon Shalarth ID Scam: जळगाव जिल्ह्यासह राज्यात चर्चेत असलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी एसआयटीकडून कारवाई सुरू आहे. शेंदुर्णीतील शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक करण्यात आली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 09, 2026 | 03:50 PM
Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon Shalarth ID Scam: आरोपींवर कठोर कारवाई करा (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • संजय गरुड आणि शशिकांत हिंगोणेकर अटकेत.
  • १७७ बनावट शालार्थ आयडींचा आरोप.
  • एकनाथ खडसेंकडून कठोर कारवाईची मागणी.
Jalgaon News:  जळगाव जिल्ह्यासह राज्यात बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याबाबत एसआयटीकडून कारवाई सुरू आहे. यात जिल्ह्यातील शेंदुर्णीतील शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांच्यासह तात्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक करण्यात आली आहे. मात्र यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. आजारी पडून दवाखान्यात जाण्याचे नाटक करणाऱ्यांना शासनाने कुठलीही सवलत देऊ नये, अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात नवनवीन खुलासे होत असल्याने जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संजय गरुड यास शेंदुर्णी एज्युकेशन शिक्षण संस्थेतील १७७ बनावट शालार्थ आयडीप्रकरणी नाशिकच्या एसआयठी पथकाने कारवाईला वेग दिला आहे. Jalgaon Shalarth ID Scam

शैक्षणिक संस्थांची व्यवहारांची तपासणी

शालार्थ शिक्षण आयडी घोटाळा जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील दी शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेत १७७ शालार्थ आयडी बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर एसआयटीने या संस्थाचालकांवर चौकशीचा फास आवळत त्यास अटक केली होती. आता जिल्ह्यात एसआयटीने इतर संस्थाचालकांचीही चौकशी सुरू केली आहे.

एसआयटीची धास्तीने संस्थाचालक पसार

संस्थाचालकांचे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्याशी असलेले संबंध व आर्थिक व्यवहारांचा तपास एसआयटीकडून सुरू आहे. शेंदुर्णी शिक्षण संस्थेतील बनावट शालार्थ आयडीची सखोल चौकशी एसआयटीने हाती घेतली आहे.जिल्ह्यातील इतर संस्थाचालकांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तो रद्द करण्यात आल्याने त्यांचीही गोची झाली आहे. एसआयटीच्या धाकाने संस्थाचालकही फरार झाल्याचे बोलले जात आहे.

Raigad News: पराभवानंतरही ओझर्डेंची सामाजिक बांधिलकी कायम; गणेशभक्तांसाठी पुन्हा मोफत एसटी सेवेची घोषणा

जिल्ह्यात चार जणांचा पोलिसांकडून शोध सुरू

या संस्थेतील सहसचिव दीपक गरुड यास ताब्यात घेतल्यानंतर या संस्थेची चौकशी सुरू असतांनाच जिल्ह्यातील इतर चार संस्थेतील संस्थाचालक मनोज पाटील, शरद शिंदे, विनीद तराळ, अमोल कुलकर्णी यांचा अटकपूर्ण जामीनहीं नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळ्याने चारही जणांवर कारवाई होण्याची शक्यता राजकीय वतुर्जातून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील या चारही संस्थाचालकांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. मात्र तत्पूर्वी त्यांनी अटकपूर्व अर्ज न्यायालयात दाखल केल्यानंतर तो रद्द करण्यात आला आहे.

Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमानाचा अपघात; विमान कोसळल्याने परिसरात खळबळ

इतर शेंदुर्णीतील संस्थांचे काय ?..

  • शेंदुर्णीतील एकाच गरुड यांच्या संस्थेत १७७ शालार्थ आयडी बनावट असल्याचे समोर आले आहे. मात्र याठिकाणी इतर संस्थाही कार्यरत आहेत.
  • या संस्थांमध्येही बनावट शालार्थ आयडीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुजू झालेले झाल्याचे सांगितले जात आहे.
  • या शिक्षण संस्थेतील बनावट शालार्थ आयडीची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Jalgaon shalarth id scam demand by mla eknathrao khadse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • crime news
  • jalgaon Crime
  • maharashtra news

संबंधित बातम्या

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई
1

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई

धक्कादायक ! अश्लील फोटोसाठी सातवीतील मुलीवर दबाव; ऑनलाईन ओळख झाली अन् नंतर त्याच…
2

धक्कादायक ! अश्लील फोटोसाठी सातवीतील मुलीवर दबाव; ऑनलाईन ओळख झाली अन् नंतर त्याच…

महिलांची बैठक लावण्यावरून वाद, कांदळीतील कलाकेंद्रात गाेळीबाराचा थरार; नेमकं काय घडलं?
3

महिलांची बैठक लावण्यावरून वाद, कांदळीतील कलाकेंद्रात गाेळीबाराचा थरार; नेमकं काय घडलं?

Himanshi Khurana: कॅनडामध्ये भारतीय तरुणीच्या हत्येने खळबळ; आंतरराष्ट्रीय मोहिमेनंतर आरोपी अब्दुलला टोरोंटो विमानतळावर केली अटक
4

Himanshi Khurana: कॅनडामध्ये भारतीय तरुणीच्या हत्येने खळबळ; आंतरराष्ट्रीय मोहिमेनंतर आरोपी अब्दुलला टोरोंटो विमानतळावर केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.