Uttarpradesh Crime: थरारक घटना! 23 वर्षीय तरुणीकडून आई-भावाची निर्घृण हत्या; कारण काय?
कसा झाला अपघात, काय घडलं?
गोपाल वासुदेव खडके(वय ५०) आणि सोनाली गोपाल खडके (वय ४५, रा. सातबारा) हे आपल्या दुचाकीने घरी परतत होते. जामनेर महामार्गावरील तोरणाळा गावाजवळील स्मशानभूमीजवळ आले असताना, वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटले. परिणामी, समोरून चाललेल्या एका ट्रॅक्टरला दुचाकीने मागून जोरदार धडक दिली.
या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गोपाळ खडके आणि सोनाली खडके असे नाव आहे. ही धडक एवढी जोरदार होती की हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्यामुळे या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सोबत असलेली त्यांची एक वर्षांची लहान मुलगी देखील होती. या भीषण अपघातात या चिमुकलीचे प्राण सुदैवाने वाचले.
परिसरात हळहळ
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जामनेर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nesco Drugs Case : नेस्को ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक, मुख्य आरोपी भारत सोडून फरार
दगडाने ठेचून 32 वर्षीय तरुणाचा खून; खिशातील लग्नपत्रिकेमुळे हत्येचा उलगडा
जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली होती. या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत चतुराईने आरोपींना अटक केली आहे. मृतक तरुणाच्या खिशात लग्नपत्रिका सापडल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Ans: जळगाव-जामनेर महामार्गावरील तोरणाळा गावाजवळ.
Ans: दुचाकीने ट्रॅक्टरला धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
Ans: एक वर्षाची मुलगी चमत्कारिकरित्या सुरक्षित बचावली आहे.






