Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमानाचा अपघात (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतलेल्या या विमानाला हवेत असतानाच काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने विमानाला अपघात झाला. नेमका बिघाड कोणता होता आणि त्याचा विमानाच्या उड्डाणावर किती परिणाम झाला, याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्ट माहिती मिळणार आहे. उपलब्ध वृत्तांनुसार, या घटनेत प्रशिक्षणार्थी वैमानिक बचावल्याची माहिती आहे.Baramati Plane Crash:
अनिवासी कामगारांची नावे कराड दक्षिणच्या मतदार यादीत आढळल्यास तीव्र आक्षेप; चौकशीची मागणी
घटना घडल्यानंतर विमानतळ परिसरात संबंधित कर्मचारी आणि इतर यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. अपघातस्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करण्यात आली. विमानाचे नुकसान किती झाले, याचीही पाहणी केली जात आहे. त्याचबरोबर विमानाच्या उड्डाणापूर्वी करण्यात आलेल्या तपासण्या, त्याची तांत्रिक स्थिती आणि त्या वेळची परिस्थिती याची माहिती घेतली जाण्याची शक्यता आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शेवटच्या वर्षातील वेतनवाढ नाकारणे चुकीचे; थकबाकी देण्याचे आदेश
(टीप- ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.)






