जळगाव : कांद्याला भाव नसल्याने भाव वाढ होईल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली आहे. परंतु कांद्याला अद्याप भाव मिळत नाही. आतापर्यंत या सहा महिन्यांमध्ये २०% कांदा हा खराब होऊन फेकण्यात आला आहे आणि आता देखील काही कांदा खराब होत आहे, काहीं कांद्याची पात वर आलेली आहे त्यात केंद्र सरकारने निर्यातीवरती वरती ४०% कर आकारण्याचे निर्णय घेतल्यानंतर राज्यभरामध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. राज्यातील कृषी मंत्री यांनी केंद्रात जाऊन नाफेडच्या माध्यमातून २४१० रुपये भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचे घोषणा केली.
परंतु त्या नाफेड केंद्रामार्फत कांदा खरेदी करण्यासाठी लावलेल्या निकष आणि राज्यामध्ये नाफेडचे केंद्र किती खरेदी करेल याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक ना अनेक प्रश्न सरकारच्या बाबतीत निर्माण होत आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत की शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत, असा संताप जनक प्रश्न सरकारला कांदा उत्पादक शेतकरी नारायण पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. नाफेड केंद्राच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यासाठी लावलेल्या निकषामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही असे शेतकरी नारायण पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी कांदा उत्पादक शेतकरी नारायण पाटील यांनी त्यांचे मत शासनासमोर व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले, सरकारने जो काही निर्णय घेतला आहे आणि जो जीआर काढला आहे त्यांनी २४१० आणि २४.१० पैश्यांनी खरेदी करू असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडमध्ये सांगितले. परंतु त्यांनी असे सांगावे की त्यांनी किती नाफेडची केंद्र सुरु केली आहेत. त्यांनी ४ ते ६ दिवसांमध्ये ४ क्विंटल तरी कांदा खरेदी केला आहे? सध्या माझ्याकडे १५० क्विंटल कांदा आहे. या कांद्याची सहा महिने मी साठवण केली आहे. आतापर्यत त्यांच्या कांद्याला भाव मिळत नाहीये असे त्यांनी सांगितले.